15 December 2024 1:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON
x

Credit Card Payment | क्रेडिट कार्डचे बिल भरण्याची तारीख निघून गेली? आता कोणताही दंड भरावा लागणार नाही, नियम वाचा

Credit Card Payment

Credit Card Payment | जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल, तर तुमच्या व्यवहाराचे बिलिंग चक्र पूर्ण होण्याआधी जी थकबाकी आहे ती देय तारखेपूर्वी परतफेड करा. जर तुम्ही वेळेवर थकबाकी भरली नाही तर हे कर्ज तुमच्या खिष्यावर ओझे बनून जाते. क्रेडिट थकबाकी वेळेवर न भरल्यामुळे तुम्हाला विलंब शुल्क किंवा दंड भरावा लागेल. तुमचा सिबिल स्कोअरही खराब होऊ शकतो. अशा वेळी क्रेडिट कार्ड वर आकारले जाणारे विलंब शुल्क टाळण्यासाठी तुम्ही क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरले पाहिजे. समजा तुम्ही आर्थिक अडचणीच्या वेळी क्रेडिट कार्डचे बिल भरण्यास सक्षम नसाल तर RBI चा एक खास नियम आहे जो तुमची मदत नक्की करेल.

समजा जर तुमची क्रेडिट कार्डचे बिल पेमेंट करण्याची तारीख चुकली असेल, तर तुम्ही देय तारखेची मुदत संपल्यानंतर पुढील तीन दिवसांपर्यंत थकबाकी बिल भरू शकता, असा नियम आहे. आरबीआयच्या मास्टर डायरेक्शन परिपत्रकानुसार, ज्या कंपन्या आपल्या ग्राहकांना क्रेडिट कार्ड देतात, ते मागील थकीत देय पैसे न भरल्याची तक्रार करू शकतात. तसेच या क्रेडिट कार्ड कंपन्या तुमच्यावर आर्थिक दंडही लावू शकतात. परंतु या क्रेडिट कंपन्या तुमच्यावर आर्थिक दंड लावण्याचा तीन दिवसांची अतिरिक्त मुदत संपल्यावरच लावू शकतात.

RBI च्या मास्टर डायरेक्शन क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड इश्यूज आणि कंडक्ट डायरेक्शन्स 2022 नुसार, क्रेडिट कार्ड कंपन्या उच्च व्याज, उशीरा पेमेंट फी आणि इतर शुल्क यासारखे दंड ग्राहकांवर फक्त देय तारखेनंतरच्या थकित रकमेवरच लावू शकतात. क्रेडिट कार्डच्या एकूण रकमेवर कंपन्या विलंब शुल्क किंवा कोणताही दंड लावू शकत नाही.

RBI च्या नियमानुसार देय तारीख पूर्ण झाल्यावर पुढील 3 दिवसांसाठी क्रेडिट कार्ड कंपन्या ग्राहकांवर कोणतेही दंड किंवा विलंब शुल्क आकारू शकत नाही. आरबीआयच्या मते, मागील थकबाकी आणि पेमेंट शुल्कानंतरचे दिवस ही क्रेडिट कार्ड स्टेटमेंटमध्ये दिलेली क्रेडिट देय तारीख असते. तुमच्या क्रेडिट कार्ड स्टेटमेंटवरील देय तारीख पूर्ण झाल्यावर पुढील 3 दिवसांनंतर तुमच्या विलंब शुल्काची गणना केली जाईल. अतिरिक्त तीन दिवसात विलंब शुल्क भरले तर तुम्हाला कोणताही दंड लागणार नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Credit Card Payment Rules by RBI for Late payment of Bills on 03 November 2022.

हॅशटॅग्स

Credit card payment(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x