6 December 2024 5:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bajaj Bikes | बजाज कंपनीच्या बाईक खरेदीसाठी शोरूमबाहेर मोठी गर्दी; 30 दिवसांत तब्बल 4 लाखांहून अधिक गाड्यांची विक्री Penny Stocks | 4 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला गर्दी, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, अशी संधी सोडू नका - Penny Stocks 2024 IRFC Share Price | IRFC सहित 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRFC Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड Vedanta Share Price | वेदांता शेअर फोकसमध्ये आला, रॉकेट तेजीचे संकेत, सकारात्मक बातमी आली - NSE: VEDL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, कंपनीचा मोठा निर्णय, शेअर होणार रॉकेट - NSE: TATAPOWER EDLI Scheme | पगारदारांना सुखद धक्का; EDLI योजना 3 वर्षांनी वाढली, लाभ घेणे आणखीन झाले सोपे, वाचा सविस्तर - Marathi News
x

SJVN Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, SJVN कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक खरेदीला गर्दी - Marathi News

Highlights:

  • SJVN Share PriceNSE: SJVN – एसजेव्हीएन लिमिटेड कंपनी अंश
  • कंपनीने दोन सामंजस्य करार
  • पहिला सामंजस्य करार – NSE: SJVN
  • 3 वर्षात 380% परतावा दिला – SJVN Share
SJVN Share Price

SJVN Share Price | शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी शेअर बाजार उघडताच एसजेव्हीएन लिमिटेड (NSE: SJVN) म्हणजेच सतलज जल विद्युत निगम कंपनीचे शेअर्स 4.37 टक्के वाढले होते. त्यानंतर या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली होती. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, या कंपनीने महाराष्ट्र सरकारसोबत 2 सामंजस्य करार केले आहेत. (एसजेव्हीएन लिमिटेड कंपनी अंश)

कंपनीने दोन सामंजस्य करार
या कंपनीने पंप्ड स्टोरेज प्रोजेक्ट्स आणि फ्लोटिंग सोलर प्रोजेक्ट्स उभारण्यासाठी महाराष्ट्र सरकारसोबत दोन सामंजस्य करार केले आहेत. 2024 या वर्षात एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीचे शेअर्स 44 टक्के वाढले आहे. शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5.40 टक्के वाढीसह 132.79 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

पहिला सामंजस्य करार
एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीने केलेला पहिला सामंजस्य करार SJVN लिमिटेड आणि महाराष्ट्र सरकारच्या जलसंपदा विभागाने एकूण 8100 मेगावॅट क्षमतेच्या पाच पंप स्टोरेज प्रोजेक्ट उभारण्यासाठी केला आहे. यामध्ये कोलमंडपाडा येथे 800 मेगावॅट, सिंदगडमध्ये 1,500 मेगावॅट, चोरनईमध्ये 2,000 मेगावॅट, बैतरणीमध्ये 1,800 मेगावॅट आणि जलवाडामध्ये 2,000 मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प उभारले जाणार आहेत.

3 वर्षात 380% परतावा दिला
या सामंजस्य करारांतर्गत एसजेव्हीएन लिमिटेड कंपनी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांच्या अनुषंगाने महाराष्ट्रात हे प्रकल्प वेळेत उभारण्यासाठी सर्वेक्षण, तपासणी आणि तपशीलवार प्रकल्प अहवाल तयार करणार आहे. पीएसपी पॉवर स्टोरेज, ग्रीड स्टॅबिलायझेशन, आणि कमाल वीज मागणी पूर्ण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या प्रकल्पांमुळे महाराष्ट्राला स्वच्छ ऊर्जेचा पुरवठा होणार आहे. मागील 1 आठवड्यात एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.91 टक्के, 1 वर्षात 88.10 टक्के, आणि 3 वर्षात 380.29 टक्के वाढले होते. जानेवारी ते सप्टेंबर 2024 या काळात एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीचे शेअर्स 44.68 टक्के वाढले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | SJVN Share Price 28 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

SJVN Share price(58)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x