Bigg Boss Marathi | 'हे अरबाजचे कपडे आहेत फेकून द्या', निक्कीला मिळाला गुलिगत धोका, आई म्हणाली.. - Marathi News
Highlights:
- Bigg Boss Marathi
- असं म्हणाली निक्कीची आई
- घरात घुसणार राखी सावंत नावाचं वादळ
Bigg Boss Marathi | बिग बॉसचे यंदाचे पर्व प्रचंड गाजत आहे. अनेक प्रेक्षक मोठ्या आवडीने बिग बॉस मराठी हा शो पाहण्यास पसंती दर्शवत आहेत. बिबिंच्या घरात सर्व सदस्यांचे कुटुंबीय त्यांना भेटून गेले. कोणाला आपल्या लेकीला पाहून आनंद झाला तर कोणाला आपल्या बहिणीला पाहून रडू अनावर झालं. बिग बॉसच्या घरातील हा कौटुंबिक सोहळा पाहण्यास प्रेक्षकांना फार आवडलं. प्रत्येकाच्या कुटुंबीयांनी घरामधील राहणाऱ्या सदस्यांना छान खेळा आणि ट्रॉफी आपल्या घरी घेऊन या अशा प्रकारचे सल्ले दिले.
परंतु निक्कीच्या आईने एक शॉकिंग गोष्ट सांगून निक्कीला डिप्रेशनमध्ये टाकलं आहे. निक्कीचे आई-वडील घरात येताच निक्की ढसाढसा रडायला लागते. तिला तिच्या बाबांना पाहून फारच आनंद झालेला असतो. परंतु निक्कीच्या आईने अरबाजबद्दल एक मोठा गुपित निक्कीसह सर्व प्रेक्षकांना सांगितलं आहे.
असं म्हणाली निक्कीची आई :
निक्कीच्या आई-वडिलांनी घरामध्ये एन्ट्री घेतल्यानंतर आणि संपूर्ण घर पाहिल्यानंतर बिग बॉस सर्व सदस्यांना रिलीज करतात. त्यानंतर सगळेजण पिकनिक स्पॉटवर बसून गप्पा मारू लागतात. सर्वचजण निक्कीच्या आई-वडिलांबरोबर बोलण्यात व्यस्त असतात. तितक्यात अरबाजचा विषय निघतो.
त्यादरम्यान निक्कीला थोड वेगळं वाटतं आणि ती तिच्या आईला सगळ्यांपासून दूर घेऊन जाते. त्यानंतर तिची आई तिला सांगते की,”अरबाज चुकीचा चाललाय त्याने असं नाही करायला पाहिजे त्याचा एंगेजमेंट झालेलं आहे”. आईने असं सांगितल्याबरोबर निक्कीला आश्चर्याचा धक्का बसतो. ती आईला विचारते कोणाचं, तेव्हा तीची आई म्हणते अरबाजचं. त्यानंतर बिग बॉस निक्कीच्या आई-वडिलांना घराचा निरोप घ्यायला सांगतात.
पुढे जानवीबरोबर संवाद साधताना निक्की म्हणाली की,”आता मी सांगते बिग बॉस यांना की, जर तो आला तर मी मेंटली पागल होईल जे अरबाज निक्की होतं ना इट्स ओवर”. असं निक्की ठणकावून म्हणते. निक्कीच्या अशा वक्तव्यावर नेटकऱ्यांनी तिला पुन्हा एकदा चांगलं ट्रोल केल्याचं पाहायला मिळतंय. अनेकांनी कमेंटमध्ये आपापल्या प्रतिक्रिया कळवून निक्कीला टोले लगावले आहेत. पुढे निक्कीने अरबाजचे सर्व कपडे एका काळ्या पिशवीमध्ये भरून स्टोअर रूममध्ये ठेवले आहेत. त्यानंतर ती बिग बॉस यांना म्हणाली की,” बिग बॉस हे अरबाजचे कपडे आहेत ते त्याला परत करा किंवा फेकून द्या”.
घरात घुसणार राखी सावंत नावाचं वादळ :
अशातच बिग बॉसचा एक नवा प्रोमो वायरल झाला असून, अभिनेत्री राखी सावंत ही बिग बॉसच्या घरात धुमाकूळ आणि जबरदस्त कला करायला येणार आहे. यादरम्यानचा एक प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड वायरल होत आहे. आल्याबरोबरच राखीने निक्कीला डोळ्यावर धरल्याचं पाहायला मिळालं. एपिसोडमध्ये आणखीन कोणकोणती गंमत होणार हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे.
Latest Marathi News | Bigg Boss Marathi Nikki Tamboli mother told her about Arbaaz Patel engagement 28 September 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News