13 December 2024 8:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Bigg Boss Marathi | घराबाहेर पडताना पंढरीनाथ यांनी घेतला मोठा निर्णय, सुरजला अश्रू अनावर, वाचा सविस्तर - Marathi News

Highlights:

  • Bigg Boss Marathi
  • पंढरीनाथ यांचा सुरजच्या बाबतीत मोठा निर्णय :
  • पॅडींच्या मनात ही सल कायम राहणार :
Bigg Boss Marathi

Bigg Boss Marathi | बिग बॉस मराठी हा शो फिनालेच्या शर्यतीत येऊन पोहोचला आहे. अशातच मागील आठवड्याच्या शेवटी होणाऱ्या भाऊच्या धक्क्यावर रितेशने नाही तर, चला हवा येऊ द्या फेम डॉक्टर निलेश साबळे यांनी भाऊच्या धक्क्याची धुरा सांभाळली. शनिवार आणि रविवार दोन्हीही दिवशी निलेशने आपल्या टीमबरोबर बिग बॉसच घर गाजवलं.

अखेर आठवड्याच्या शेवटी घराबाहेर जाणारा सदस्य कोण असेल याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. दरम्यान पंढरीनाथ कांबळे यांना कमी मतं पडल्यामुळे त्यांना बिग बॉसच्या घराचा निरोप घ्यावा लागला आहे. निरोप घेताना पंढरीनाथ प्रचंड भावुक झाल्याचे दिसले. त्याचबरोबर त्यांनी सुरजच्या बाबतीत एक मोठा निर्णय घेऊन प्रेक्षकांकडून कौतुकाचा मान मिळवला आहे.

पंढरीनाथ यांचा सुरजच्या बाबतीत मोठा निर्णय :

पंढरीनाथ आणि सुरज त्यांचं बॉंडिंग आगरी बिग बॉसच्या घरातील पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांना दिसत होतं. सुरज गाव खेड्यातून आलेला साधा मुलगा. त्याचबरोबर लिहिण्यावर असण्याचे देखील वांदे त्यामुळे सुरजच्या मनाची परिस्थिती लक्षात घेता पॅडी भाऊंनी सुरजला भरपूर साथ दिली. त्याला प्रत्येक गोष्ट, प्रत्येक टास्क अगदी चांगल्या पद्धतीने समजावला. सुरजने देखील त्यांच्या मार्गदर्शनाखाली बऱ्याच टास्कमध्ये बाजी मारली. दोघांचीही केमिस्ट्री पहायला प्रेक्षकांना फारच आवडत होते. दरम्यान पंढरीनाथ यांच्या घराबाहेर जाण्याने सुरज देखील प्रचंड भाऊक झाला. घरातून बाहेर पडताना प्रत्येक सदस्य आपल्या आवडते सदस्याला कॉइंसचे नॉमिनी करून जातो. पंढरीनाथ यांनी त्यांच्या कॉइंसचे नॉमिनी सुरज याला केले आहे.

त्यादरम्यान पंढरीनाथ म्हणाले की,”मी माझ्या कॉइंसचा नॉमिनी सुरज चव्हाणला करतोय. तो सगळ्या गोष्टींचा नॉमिनी असेल आणि फक्त इथेच नाही तर मी त्याचं पालकत्व आता आयुष्यभरासाठी घेतलय”. पंढरीनाथ यांचे हे शब्द ऐकून समस्त प्रेक्षकवर्ग त्यांच्यावर प्रचंड खुश आहे. पॅडींच्या निर्णयानंतर ते घरामध्ये सर्वांना गुड बाय करण्यासाठी आले. तेव्हा आल्याबरोबर पंढरीनाथ यांनी वर्षाताईंची माफी मागितली.

माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा अशा पद्धतीचं वक्तव्य पंढरीनाथ यांनी केलं. त्यानंतर लागोपाठ सर्व सदस्यांनी पंढरीनाथ यांचे पाय धरले. त्यांचा आशीर्वाद घेऊन आणि निरोप देऊन घरातील सदस्य देखील भाऊक झाले.

पॅडींच्या मनात ही सल कायम राहणार :

एलिमिनेशन टास्क वेळी बिग बॉस यांनी पंढरीनाथ कांबळे यांचं नाव घेतलं. म्हणजेच घराबाहेर जाणारा सदस्य पंढरीनाथ कांबळे आहे असं बिग बॉस यांच्याकडून जाहीर झालं. त्यानंतर पंढरीनाथ म्हणाले की,”शेवटच्या क्षणी महाअंतिम फेरीपर्यंत पोहोचता आलं नाही याची सल कायम मनात राहणार”.

Latest Marathi News | Bigg Boss Marathi Season 5 Pandharinath Kamble took big decision 30 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Bigg Boss Marathi(34)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x