1 May 2025 3:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल असलेला शेअर खरेदी करा; मोठा परतावा मिळेल - NSE: VEDL HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्समध्ये दिसणार तुफानी तेजी, संधी सोडू नका, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL Trident Share Price | 26 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, महत्वाचे संकेत, यापूर्वी 5238% परतावा दिला - NSE: TRIDENT NTPC Share Price | 461 टक्के परतावा देणारा एनटीपीसी स्टॉक पुन्हा फोकसमध्ये, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NTPC HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO RVNL Share Price | पीएसयू शेअर पुन्हा सुसाट तेजीने परतावा देणार, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL IREDA Share Price | मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार, स्वस्तात खरेदी करा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: IREDA
x

SJVN Share Price | SJVN कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिमाण, कमाईची मोठी संधी - Marathi News

Highlights:

  • SJVN Share PriceNSE: SJVN – एसजेव्हीएन लिमिटेड कंपनी अंश
  • कंपनीचा महाराष्ट्र सरकारसोबत करार
  • महाराष्ट्र सरकारसोबत दोन सामंजस्य करार
  • कंपनी फ्लोटिंग सोलार पॉवर प्लांट दोन टप्प्यात पूर्ण करणार
SJVN Share Price

SJVN Share Price | एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा (NSE: SJVN) कमावून दिला आहे. या सरकारी कंपनीचे शेअर्स शुक्रवारी मजबूत तेजीत वाढत होते. शुक्रवारी एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीचे शेअर्स 6 टक्के वाढीसह 134.89 रुपये किमतीवर ट्रेड करत होत. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. (एसजेव्हीएन लिमिटेड कंपनी अंश)

कंपनीचा महाराष्ट्र सरकारसोबत करार
शुक्रवारी या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, या कंपनीने वीज प्रकल्पांच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकारसोबत करार केला आहे. या कराराचे एकूण मूल्य 48,000 कोटी रुपये आहे. आज सोमवार दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी एसजेव्हीएन लिमिटेड या सरकारी कंपनीचे शेअर्स 2.62 टक्के घसरणीसह 130.33 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महाराष्ट्र सरकारसोबत दोन सामंजस्य करार
नवरत्न दर्जा असलेल्या एसजेव्हीएन लिमिटेड या CPSE कंपनीने स्टॉक एक्सचेंज नियामक सेबीला कळवले आहे की, त्यांनी महाराष्ट्रातील पंप स्टोरेज प्रकल्प आणि फ्लोटिंग सोलार पॉवर प्लांटसाठी महाराष्ट्र सरकारसोबत दोन सामंजस्य करार केले आहेत. या पहिल्या मेमोरँडमवर एसजेव्हीएन लिमिटेड आणि महाराष्ट्र राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाने स्वाक्षरी केली आहे. या करारा अंतर्गत एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीला 8100 मेगावॅट क्षमतेचे पाच पंप स्टोरेज प्रकल्प उभारायचे आहे.

कंपनी फ्लोटिंग सोलार पॉवर प्लांट दोन टप्प्यात पूर्ण करणार
दुसऱ्या करारामध्ये एसजेव्हीएन लिमिटेड आणि महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी यांनी स्वाक्षरी केली आहे. या करारा अंतर्गत एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीला महाराष्ट्रातील लोअर वर्धा धरणावर 505 मेगावॅट क्षमतेचा फ्लोटिंग सोलार पॉवर प्लांट उभारायचा आहे. हा 505 मेगावॅट क्षमतेचा फ्लोटिंग सोलार पॉवर प्लांट दोन टप्प्यात पूर्ण केला जाईल.

यामध्ये पहिला टप्पा 100 मेगावॅटचा आणि दुसरा टप्पा 405 मेगावॅटचा असेल. या ठिकाणच्या प्रकल्पांचा समावेश 8100 मेगावॅट क्षमतेच्या पंपेड स्टोरेज प्रकल्पांमध्ये करण्यात आला आहे. कोलमंडपाडा, 1500 मेगावॅट सिदगड, 2000 मेगावॅट चोरनई, 1800 मेगावॅट बैतरणी आणि 2000 मेगावॅट जलवाडा येथे 800 मेगावॅट क्षमतेचे पंप स्टोरेज प्रकल्प विकसित केले जाणार आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | SJVN Share Price 30 September 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

SJVN Share price(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या