 
						Solar Industries Share Price | सोलर इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4 टक्के वाढीसह 5359.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सोलर इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स जागतिक नकारात्मक भावनाच्या विरोधात तेजीत वाढत आहेत. सरकारी मालकीच्या कोल इंडिया कंपनीने आता सोलर इंडस्ट्रीज कंपनीला 1853 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिल्याने सोलर इंडस्ट्रीज स्टॉकमध्ये तेजी पाहायला मिळत आहे.
कोल इंडिया कंपनीने ही ऑर्डर स्फोटकांचा पुरवठा करण्यासाठी दिली आहे. या स्फोटकांचा पुरवठा पुढील 2 वर्षांत पूर्ण केला जाणार आहे. आज मंगळवार दिनांक 10 ऑक्टोबर 2023 रोजी सोलर इंडस्ट्रीज स्टॉक 0.61 टक्के वाढीसह 5,195.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
सोलर इंडस्ट्रीज कंपनीला कोल इंडिया कंपनीकडून स्फोटकांचा पुरवठा करण्याची जबाबदारी मिळाली आहे. या स्फोटकांची डिलिव्हरी करण्यासाठी कंपनीला 2 वर्षांची मुदत देण्यात आली आहे. सोलर इंडस्ट्रीज ही नागपूर स्थित कंपनी स्फोटके आणि स्फोटक उपकरणे यांची सर्वात मोठे उत्पादक आणि पुरवठादार म्हणून ओळखली जाते. सोलर इंडस्ट्रीज कंपनी काडतूस स्फोटके, डिटोनेटर आणि कास्ट बूस्टर उत्पादनांचा व्यवसाय करते.
मागील एका महिन्यांत सोलर इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 11.17 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 3 महिन्यांत सोलर इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 50 टक्के परतावा कमवून दिला आहे. 11 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3540.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तरर 9 ऑक्टोबर 2023 रोजी सोलर इंडस्ट्रीज स्टॉक 5359.95 रुपये किमतीवर पोहोचले होते.
मागील 6 महिन्यांत या सोलर इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 40 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 411 टक्के वाढली आहे. सोलर इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 3456.95 रुपये होती. तर या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 46600 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		