Stock To Buy | दुप्पट कमाई करण्याची मोठी संधी, लाभांशासह 35 टक्के परतावा, हा शेअर खरेदीचा सल्ला
Stock To Buy | 1988 साली स्थापन झालेली कंपनी कॉम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस ही मालमत्ता व्यवस्थापन करते आणि अशा कॉर्पोरेट कंपन्यांसाठी म्युच्युअल फंड ट्रान्सफर एजन्सी म्हणून काम करते, ज्याची 70 टक्के मालमत्ता व्यवस्थापनाखाली आहेत. ही कंपनी आपल्या ग्राहकांना ऑनलाइन व्यवहार, मेलबॅक, भांडवली लेखा, सदस्यता, विक्री प्रणाली समर्थन आणि गुंतवणूकिबाबत सेवा सुविधा प्रदान करते.
डबल फायदा कमाव्याची संधी :
कॉम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस/CAMS या शेअर मध्ये गुंतवणूक केल्यास तुम्ही दुप्पट फायदा मिळवू शकता. समजा जर तुम्ही आता सध्याच्या किंमत पातळीवर या कंपनीचा स्टॉक आपल्या पोर्टफोलिओमध्ये जोडला तर तुम्ही शेअरवर भरपूर नफा कमवू शकता, आणि सोबत तुम्हाला कंपनी शेअर्सवर लाभांशही देणार आहे. नुकताच या कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना लाभांश देण्याचे जाहीर केले आहे.
प्रसिद्ध ब्रोकरेज फर्म JM फायनान्शिअलने 2 आठवड्यांपूर्वीच्या जाहीर केलेल्या अहवालात या कंपनीच्या शेअर्सवर 3300 रुपयांची लक्ष्य किंमत निश्चित करून स्टॉकला खरेदी करण्याचा सल्ला दिला होता. JM फायनान्शिअल या स्टॉक बाबत सकारात्मक असून त्यांनी हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला आपल्या अहवालात दिला आहे. सध्या या कंपनीचे शेअर 2453.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. म्हणजेच, जर तुम्ही सध्याच्या किंमत पातळीवर हा स्टॉक खरेदी केला तर, या स्तरावरून तुम्हाला 34.48 टक्के परतावा मिळेल. जर तुम्ही या स्टॉकमध्ये आता 3 लाख रुपये गुंतवले तर अल्पावधीत तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 4 लाख रुपये पर्यंत जाऊ शकते.
लाभांशाची घोषणा :
कंपनीच्या संचालक मंडळाने नुकताच पार पडलेल्या बैठकीत आपल्या विद्यमान शेअर धारकांना अंतरिम लाभांश देण्याचे जाहीर केले आहे. यासाठी कंपनीने रेकॉर्ड तारखेत बदल केले आहे. या कंपनीच्या संचालक मंडळाने स्टॉक मार्केट नियामकला सादर केलेल्या फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, त्यांनी लाभांशाची रेकॉर्ड तारीख 16 नोव्हेंबर 2022 वरून बदलून 17 नोव्हेंबर 2022 केली आहे.
शेअरची कामगिरी :
मागील आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 4.64 टक्क्यांनी पडले होते, तर मागील एका महिन्यात हा स्टॉक 1.30 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. गेल्या 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्समध्ये फक्त 2.33 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. चालू वर्ष 2022 मध्ये आतापर्यंत या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदाराचे 10.42 टक्के नुकसान केले आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 3250 रुपये होती, आणि नीचांक किंमत पातळी 2039 रुपये होती.
कंपनीचे बाजार भांडवल :
चेन्नईस्थित या कंपनीचे बाजार भांडवल 12,021.80 कोटी रुपये आहे. कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना सुरुवातीपासून आतपर्यंत 75.07 टक्के परतावा कमावून दिला आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये या कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध झाले होते. व्ही शंकर यांनी CAMS कंपनीची स्थापना 1988 साली केली होती. Y2K संगणक त्रुटीमुळे CAMS कंपनी इन-हाउस आर्थिक सेवांकडे वळली. CAMS कंपनीमध्ये सुरुवातिच्या काळात फक्त 20 कर्मचारी होते. नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला या कंपनीने हस्तांतरण एजन्सी ऑपरेशन प्रक्रिया सुरू केली होती. CAMS कंपनीने आतपर्यंत IPCA Laboratories, Wockhardt Ltd., RPPL चे NCD इश्यू, RPEL, आणि Crossland Research Labs Ltd सह अनेक कंपन्याचे IPO हाताळन्याचे काम केले होते. CAMS कंपनीने 1996 साली फोर्ड एस्कॉर्ट्स कंपनीच्या प्राथमिक शेअर्स वाटपावर प्रक्रिया केली होती. फोर्ड इंडियाने 1996 साली आपले प्राथमिक शेअर्स जरी केले होते.
शेअर्समध्ये गुंतवणूक करावी?
स्मॉल कॅप कंपनीच्या पेनी स्टॉक्समध्ये गुंतवणूक करणे जोखमीचे असते म्हणून तुम्ही त्यात पैसे लावणे टाळले पाहिजे. चांगला परतावा कमावण्यासाठी मजबूत फंडामेंटल्स असलेल्या कंपन्यामध्ये गुंतवणूक करा. मजबूत फंडामेंटल्स असलेल्या कंपन्या शेअर बाजारातील चढ-उतार सहन करण्यास सक्षम असतात. असे शेअर्स दीर्घ कालावधीत भरघोस परतावा कमावून देतात. अशा कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांना अधिक तरलता देतात. स्मॉल कॅप पेनी स्टॉक कंपनीत गुंतवणूक करण्यापूर्वी लोकांनी संशोधन करावे, तज्ञाशी सल्लामसलत करावे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Computer Edge Management Services stock recommended to buy from stock market expert and JM financial on 07 November 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा