
Sonalis Consumer Products IPO | सोनालीस कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. शुक्रवारी या IPO चा शेवटचा दिवस होता. सोनालीस कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड कंपनीचा IPO एकूण 12.37 पट सबस्क्राइब झाला आहे. सोनालीस कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड कंपनीच्या आयपीओमध्ये शेअरची किंमत बँड 30 रुपये ठरवण्यात आली आहे.
चित्तोडगड फर्मच्या अहवालानुसार सोनालीस कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड कंपनीच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणुकदरांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 21.69 पट सबस्क्राईब झाला आहे. तर गैर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 2.92 पट सबस्क्राईब झाला आहे. सोनालीस कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड कंपनीचा IPO ओपन झाल्यावर पहिल्या दिवशी 1.64 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. तर दुसऱ्या दिवशी हा स्टॉक 6.05 पट सबस्क्राइब झाला होता.
सोनालिस कन्झ्युमर प्रॉडक्ट्स GMP
सोनालिस कन्झ्युमर प्रॉडक्ट्स कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 3 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत, अशी माहिती तज्ञांनी दिली आहे. म्हणजेच हा ट्रेंड असाच सुरू राहिला तर सोनालिस कन्झ्युमर प्रॉडक्ट्स कंपनीचे शेअर्स 33 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात. पुढील काळात ग्रे मार्केट प्रीमियममध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. सोनालीस कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड कंपनीच्या आयपीओचा आकार 2.83 कोटी रुपये आहे. ही कंपनी मुख्यतः महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा राज्यात फराळ विकीचे काम करते.
Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.