
South Indian Bank Share Price | मागील एका वर्षात साऊथ इंडियन बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 214 टक्के नफा कमावून दिला आहे. साऊथ इंडियन बँकेचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के वाढीसह 24.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या बँकेचे एकूण बाजार भांडवल 5018 कोटी रुपये आहे. साऊथ इंडियन बँकेच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 7.85 रुपये होती.
मागील 5 दिवसात, साउथ इंडियन बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 16 टक्के नफा कमावून दिला आहे. अवघ्या 5 दिवसात हा स्टॉक 21.40 रुपये वरून वाढून 24.75 रुपये किमतीवर पोहचला होता. आज गुरूवार दिनांक 24 ऑगस्ट 2023 रोजी साऊथ इंडियन बँकेचे शेअर्स 3.04 टक्के घसरणीसह 23.90 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
मागील महिन्यात 24 जुलै 2023 रोजी साऊथ इंडियन बँकेचे शेअर्स 20.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून शेअरची किंमत 20 टक्के अधिक वाढली आहे. 23 फेब्रुवारी 2023 रोजी या बँकेचे शेअर्स 16.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून शेअरची किंमत 48 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. मागील वर्षी 23 ऑगस्ट रोजी साऊथ इंडियन बँकेचे शेअर्स 8 रुपये या नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून गुंतवणूकदारांनी 214 टक्के नफा कमावला आहे.
ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने साऊथ इंडियन बँकेच्या शेअरवर 28 रुपये लक्ष किंमत जाहीर करून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. पुढील काळात या कंपनीचे शेअर्स सध्याच्या किंमत पातळीवरून 20 टक्के अधिक वाढू शकतात. साऊथ इंडियन बँकेच्या एमडी आणि सीईओपदी शेषाद्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे. म्हणून पुढील काळात साऊथ इंडियन बँकेचे कामकाज आणि नफा झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. सर्व बाबींचा विचार करून ICICI सिक्युरिटीज फर्मने साऊथ इंडियन बँकेच्या शेअर्सवर 28 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे.
ICICI सिक्युरिटीज फर्मने म्हटले आहे की, PR शेषाद्री यांना साऊथ इंडियन बँके च्या MD आणि CEO पदी 3 वर्षांसाठी नियुक्त करण्यात आले आहे. शेषाद्री मुख्यतः नवीन लँडिंग पद्धतीचे संचालन करण्यासाठी, जोखीम हाताळण्यासाठी, आणि एचआर पद्धतींमध्ये परिवर्तन करण्यासाठी ओळखले जातात. यामुळे साऊथ इंडियन बँकेचा कामकाजावर देखील जबरदस्त सुधारणा पाहायला मिळू शकते, असे तज्ञ म्हणाले.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.