
Sprayking Agro Share Price | सध्या जर तुम्ही गुंतवणुकीसाठी भरघोस परतावा देणारा मल्टीबॅगर स्टॉक शोधत असाल, तुम्ही स्प्रेकिंग अॅग्रो इक्विपमेंट कंपनीच्या स्टॉकवर लक्ष ठेवू शकता. स्प्रेकिंग अॅग्रो इक्विपमेंट कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत बक्कळ पैसा कमावून दिला आहे.
मागील 6 महिन्यांत शेअरने 600 टक्के परतावा दिला
मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने लोकांना 600 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील शुक्रवारी स्प्रेकिंग अॅग्रो इक्विपमेंट कंपनीचे शेअर 0.23 टक्क्यांच्या घसरणींसह 170.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज सोमवार दिनांक 19 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.00 टक्के घसरणीवसह 161.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
एकूण बाजार भांडवल 179.71 कोटी रुपये
स्प्रेकिंग अॅग्रो इक्विपमेंट कंपनीचे एकूण बाजार भांडवल 179.71 कोटी रुपये आहे. तर हा कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 177.90 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 12.06 रुपये होती.
मोफत बोनस शेअर्स वाटप
स्प्रेकिंग अॅग्रो इक्विपमेंट या स्मॉल कॅप कंपनीच्या स्टॉकने एप्रिल 2023 मध्ये आपल्या शेअर धारकांना 2 : 3 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या शेअर्सची संख्याही जबरदस्त वाढली आहे. सप्टेंबर 2016 मध्ये स्प्रेकिंग अॅग्रो इक्विपमेंट कंपनीने आपला IPO बाजारात लाँच केला होता.
स्प्रेकिंग ऍग्रो इक्विपमेंट कंपनीचा IPO सप्टेंबर 2016 मध्ये शेअर बाजारात खुला करण्यात आला होता. या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 21 रुपये निश्चित करण्यात आली होती. तर शेअरची लॉट साइज 6000 शेअर्स होती. IPO गुंतवणूकदारांना एक लॉट खरेदी करण्यासाठी किमान 1.26 लाख रुपये जमा करावे लागले होते.
28 एप्रिल 2023 रोजी स्प्रेकिंग अॅग्रो इक्विपमेंट कंपनीने आपल्या शेअर धारकांना 2 : 3 या प्रमाणात मोफत बोनस शेअर वाटप केले होते. याचा अर्थ कंपनीने प्रत्येक तीन शेअरवर दोन बोनस शेअर्स मोफत दिले होते. ज्या लोकांनी हा स्टॉक आतपर्यंत होल्ड केला आहे, त्यांच्या शेअरची संख्या एकूण 10000 झाली आहे. 1.26 लाख रुपये गुंतवणुकीचे मूल्य 17.56 लाख झाले आहे.
स्प्रेकिंग ऍग्रो इक्विपमेंट शेअरची किंमत आज 161.55 रुपये किमतीवर पोहचली आहे. जर तुम्ही या कंपनीच्या IPO मध्ये पैसे लावले असते तर तुमच्या 1.26 लाख रुपये गुंतवणुकीचे मूल्य 17.56 लाख झाले असते. म्हणजेच तुम्हाला एकूण 1300 टक्के नफा झाला असता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.