 
						Stock Investment | चालू आर्थिक वर्ष 2022 च्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल बाहेर यायला सुरुवात झाली आहे. शेअर बाजारातील किरकोळ ट्रेडर्सचे लक्ष आता दिग्गज गुंतवणूकदारांच्या गुंतवणूकीवर लागून राहिले आहे. प्रसिद्ध गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांनी “मेगा स्टार फूड्स” कंपनीवर पैज लावली आहे. कंपनीच्या लेटेस्ट शेअरहोल्डिंग पॅटर्नमध्ये आशिष कचोलिया त्यांचे नाव आले आहे. या दिग्गज गुंतवणूकदाराने किती शेअर्स खरेदी केले आहेत, याचा आढावा आपण घेणार आहोत. आज ट्रेडिंग सेशनमध्ये मेगास्टार फूड कंपनीच्या शेअर्समध्ये 5 टक्केचा अपर सर्किट लागला होता.
शेअरहोल्डिंग पॅटर्न :
चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत मेगास्टार फूड्स लिमिटेडच्या शेअर होल्डिंग डेटा पॅटर्ननुसार, आशिष कचोलिया यांच्या पोर्टफोलिओ मध्ये मेगास्टार फूड कंपनीचे 1,03,666 शेअर्स आहेत. म्हणजेच या कंपनीत आशिष कचोलिया यांचा 1.04 टक्के वाटा आहे. यापूर्वी, एप्रिल-जून तिमाहीत कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्नमध्ये त्यांचे नाव सामील नव्हते. एखाद्या कंपनीच्या शेअरहोल्डिंग चार्टमध्ये जेव्हा गुंतवणूकदाराचा हिस्सा 1 टक्क्यांपेक्षा अधिक असतो तेव्हा त्याचे नाव शेअरहोल्डिंग चार्ट डेटा मध्ये सामील केले जाते.
गुंतवणुकीवर एकूण परतावा :
अलिकडील काही वर्षांत स्टॉक मार्केटमध्ये अनेक नवीन मल्टीबॅगर स्टॉक तयार झाले आहेत, मेगा स्टार फूड ही कंपनी त्यापैकीच एक आहे. चालू वर्षात सुरुवातीला कंपनीचा शेअर किंमत 56 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, त्यात वाढ होऊन स्टॉक सध्या 214 रुपयांवर ट्रेड करत आहे. 2022 मध्ये कंपनीच्या शेअरच्या किमतीत 300 टक्क्यांची भरघोस वाढ पाहायला मिळाली आहे. एक वर्षभरापूर्वी या कंपनी शेअर 30 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. म्हणजेच अवघ्या एका वर्षात शेअर्समध्ये 400 टक्क्यांहून अधिक वाढ पाहायला मिळाली आहे. 25 मे 2018 रोजी हा स्टॉक BSE वर 30 रुपये किमतीत मिळत होता, तेव्हापासून कंपनीच्या शेअरमध्ये 630 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 228.90 रुपये आहे. तर 52 आठवड्यांची नीचांकी पातळी किंमत 39 रुपये होती. कंपनीचे बाजार भांडवल 215.03 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		