
Stocks To BUY | जबरदस्त पडझडीनंतर जुलै महिन्यात भारतीय इक्विटी मार्केटमध्ये थोडीफार तेजी पाहायला मिळाला. जुलैमध्ये जागतिक शेअर बाजारातील चढ-उतारानंतरही भारतीय शेअर बाजाराने 8 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच शेअर बाजारात सकारात्मक तेजी पाहायला मिळत आहे. परकीय गुंतवणूकदार बाहेर पडल्यानंतर जवळपास 9 महिन्यांनी भारतीय बाजारपेठेत FII म्हणजेच परकीय गुंतवणूक संस्थांची गुंतवणूक वाढली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या पडझडीमुळे बाजाराला थोडी चालना मिळाली आहे. ऑगस्ट महिन्यात भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टी मध्ये आतापर्यंत २ टक्क्यांहून अधिक वाढ पाहायला मिळाली आहे.
येस सिक्युरिटीजने चार जबरदस्त स्टॉकची निवड केली आहे. बाजारातील अनेक स्टॉक ची कामगिरी आणि परतावा पाहता, अनेक ब्रोकरेज कंपन्यांनी काही शेअर्सच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. येस बँकेच्या ब्रोकरेज फर्म येस सिक्युरिटीजने ऑगस्टमध्ये गुंतवणुकीसाठी शिफारस केलेल्या काही 4 शेअर्सबद्दल आम्ही आज तुम्हाला या लेखात माहिती देणार आहोत.
PSP प्रोजेक्ट :
या शेअरला येस सिक्युरिटीजने बाय (खरेदी) रेटिंग दिले आहे, ब्रोकरेज फर्मने या स्टॉकची किंमत 725 रुपये ठरवली आहे. सध्या पीएसपी प्रोजेक्ट कंपनीचा स्टॉक 636.25 रुपये वर ट्रेड करत आहे. येस बँक सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार, कंपनीच्या शेअरमध्ये पुढील काळात 15 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे.
अॅक्सिस बँक :
अॅक्सिस बँकेच्या शेअरला येस बँक सिक्युरिटीजने बाय (खरेदी) रेटिंग दिले आहे. येस सिक्युरिटीने अॅक्सिस बँकेच्या शेअर्ससाठी 918 रुपयांचे लक्ष्य निर्धारित केले आहे. सध्या अॅक्सिस बँकेचा शेअर 745.75 रुपये च्या जवळपास ट्रेड करत आहे. पुढील काळात ॲक्सिस बँकेच्या स्टॉक मध्ये 23 टक्क्यांची वाढ होऊ शकते.
रामको सिमेंट :
सिमेंट स्टॉक रामको सिमेंटला येस सिक्युरिटीजने बाय (खरेदी) रेटिंग दिले आहे. येस सिक्युरिटीजने या शेअरची पुढील काळातील लक्ष्य किंमत 931 रुपये ठरवली आहे. सध्याच्या शेअर 754.50 रुपयेच्या आसपास ट्रेड करत आहे. येस सिक्युरिटीजच्या मते, द रॅमको सिमेंटच्या शेअरच्या किमतीत पुढील काळात 23 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ दिसू शकते.
भारती एअरटेल :
भरती एअरटेल च्या स्टॉकला देखील येस सेक्युरिटीज ने बाय (खरेदी) असे रेटिंग दिले आहे. हा ब्रोकरेज कंपनी ने एअरटेलच्या स्टॉकसाठी पुढील काळात 901 रुपयांची लक्ष्य किंमत ठरवली आहे. सध्या भरती एअरेटेल कंपनीचा शेअर सुमारे 704.35 रुपयेवर ट्रेड करत आहे. येस सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार, एअरटेलच्या शेअरमध्ये पुढील काळात 28 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.