
Stocks To Buy | सध्या शेअर बजार अस्थिर आणि कमजोर आहे. जागतिक नकारात्मक भावनांमुळे शेअर बाजारात विक्रीचा दबाव वाढत आहे. शेअर बाजार पडतोय म्हणून पॅनिक होण्याची गरज नाही. हीच खरी गुंतवणूकीची संधी असते. जेव्हा लोक घाबरून स्टॉक विकतात, तेव्हा आपण खरेदीला सुरुवात केली पाहिजे. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 5 स्टॉकची माहिती आणि त्यांच्या लक्ष्य किंमतीबद्दल माहिती देणार आहेत. चला तर मग जाणून घेऊ सविस्तर माहिती.
क्रॉम्पटन ग्रीव्स कंज्यूमर :
‘क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंझ्युमर’ कंपनीचे शेअर्स 14 मार्च 2023 रोजी 1.95 टक्के घसरणीसह 288.85 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीच्या शेअरची आजची नीचांक किंमत पातळी 290.05 रुपये होती. तर 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 429.00 रुपये होती. शेअर रिसर्च फर्म जेफरीजने या कंपनीच्या स्टॉकसाठी 430 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. त्यानुसार हा स्टॉक पुढील काळात 44 टक्के परतावा मिळवून देऊ शकतो.
व्ही-गार्ड इंडस्ट्रीज :
‘व्ही-गार्ड इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स 14 मार्च 2023 रोजी 0.22 टक्के वाढीसह 248.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीच्या शेअरची वार्षिक नीचांक किंमत पातळी 195.15 रुपये होती. तर उच्चांक किंमत पातळी 274.90 रुपये होती. रिसर्च फर्म जेफरीजने या कंपनीच्या स्टॉकसाठी 310 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. त्यानुसार पुढील काळात हा स्टॉक 26 टक्के परतावा मिळवून देऊ शकतो.
अंबर एंटरप्रायझेस इंडिया :
‘अंबर एंटरप्रायझेस इंडिया’ कंपनीचे शेअर्स 1.96 टक्के घसरणीसह 1,940.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीच्या शेअरची वार्षिक नीचांक किंमत पातळी 1,843.00 रुपये होती. तर उच्चांक किंमत पातळी 4,025.95 रुपये होती. स्टॉक रिसर्च फर्म जेफरीजने या कंपनीच्या स्टॉकसाठी 2870 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. त्यानुसार, हा स्टॉक पुढील काळात 43 टक्के परतावा कमावून देऊ शकतो.
फिनोलेक्स इंडस्ट्रीज :
‘फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 1.39 टक्के घसरणीसह 163.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीच्या शेअरची वार्षिक नीचांक किंमत पातळी 121.50 रुपये होती. तर उच्चांक किंमत पातळी 195.00 रुपये होती. स्टॉक रिसर्च फर्म जेफरीजने या कंपनीच्या स्टॉकसाठी 220 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. त्यानुसार, हा स्टॉक पुढील काळात 29 टक्के परतावा मिळवून देऊ शकतो.
सुप्रीम इंडस्ट्रीज लिमिटेड :
‘सुप्रीम इंडस्ट्रीज लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 14 मार्च 2023 रोजी 5.23 टक्के घसरणीसह 2,527.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीच्या शेअरची वार्षिक नीचांक किंमत पातळी 1,666.25 रुपये होती. तर उच्चांक किंमत पातळी 2,855.30 रुपये होती. स्टॉक रिसर्च फर्म कंपनी जेफरीजने या स्टॉकसाठी 3060 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. त्यानुसार, हा स्टॉक पुढील काळात 13 टक्के परतावा देऊ शकतो.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.