
Suzlon Energy Share Price | डिसेंबर 2022 तिमाहीनंतर एनर्जी सेक्टरमधील स्टॉकमध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. ‘सुझलॉन एनर्जी’ कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ जबरदस्त तिमाही निकाल जाहीर केल्यानंतर पाहायला मिळाली आहे. मात्र आज सोमवार दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.98 टक्के घसरणीसह 8.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. वास्तविक डिसेंबर 2022 तिमाहीत या कंपनीच्या निव्वळ नफ्यात दुप्पट वाढ झाली आहे. मागील पाच वर्षांत या कंपनीचे शेअर्स 97 टक्के कमजोर झाले आहेत. या दरम्यानच्या काळात शेअरची किंमत 355 रुपयेवरून 8.15 रुपयेवर आली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Suzlon Energy Share Price | Suzlon Energy Stock Price | BSE 532667 | NSE SUZLON)
चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर 2022 तिमाहीत ‘सुझलॉन एनर्जी लिमिटेड’ कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा दुप्पट झाला असून ७८.२८ कोटी रुपयेवर पोहचला आहे. खर्चात कपात केल्याने कंपनीच्या तिमाही नफ्यात ही वाढ पाहायला मिळाली आहे. तर मागील आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर 2021 तिमाहीत कंपनीने 36.77 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. सुझलॉन एनर्जी कंपनीचा महसूल समीक्षाधीन तिमाहीत 1,615 कोटी रुपयांवरून कमी होऊन 1,464 कोटी रुपयांवर आला आहे. या काळात कंपनीचा एकूण खर्चही 1,386 कोटी रुपयांवर आला आहे. एक वर्षभरापूर्वी याच तिमाही कालावधीत कंपनीचा एकूण खर्च 1,573 कोटी रुपये होता.
कंपनीचे स्पष्टीकरण :
एका जाहीर निवेदनात, सुझलॉन एनर्जी उद्योग समूहाचे उपाध्यक्ष गिरीश तांती म्हणाले, “2023 या नवीन वर्षाचा आरंभ पवन ऊर्जा क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण धोरणात्मक घोषणांसह आणि अतिशय उत्साहवर्धक नोंदीसह झाला आहे. भारतीय पवन ऊर्जा क्षेत्र देशाच्या विकासात तसेच पर्यावरण पूरक ऊर्जा निर्मिती क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देण्याच्या मार्गावर आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.