Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांचा शेअर खरेदीचा सल्ला, काय म्हटलं तज्ज्ञांनी पहा

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये मागील काही दिवसांपासून सातत्याने तेजी पाहायला मिळत होती. मात्र आज या शेअरमध्ये गुंतवणूकदारांनी जबरदस्त नफा वसुली केली आहे. 2023 या वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 271 टक्के वाढले आहेत. या काळात शेअरची किंमत 10 रुपयेवरून वाढून 40 रुपये किमतीवर पोहोचली आहे.

मागील सहा महिन्यांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 225 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअरची किंमत 738 टक्के मजबूत झाली आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी स्टॉक 1 टक्के घसरणीसह 39.65 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तर आज बुधवार दिनांक 6 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.39 टक्के घसरणीसह 39.10 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

एकेकाळी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 500 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 2005 च्या शेवटी सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये घसरण सुरू झाली आणि या कंपनीचे शेअर्स 500 रुपयेवरून घसरून 2019 पर्यंत 2 रुपये किमतीवर आले होते. मागील एका वर्षापासून या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे.

कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजच्या मते, सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीवरील त्याचे रिव्हर्स व्हॅल्युएशन शेअर बाजाराच्या दृष्टिकोनातील त्रुटी दर्शवते. ब्रोकरेज फर्मच्या मते, सुझलॉन एनर्जी कंपनीचे मूल्यांकन बाजार भांडवलाच्या तुलनेत अधिक आहे.

सुझलॉन एनर्जी कंपनीने आपल्या निवेदनात म्हंटले होते की, “भारतीय अर्थव्यवस्थेचे होणारे विद्युतीकरण आणि देशातील विजेच्या मागणीत होणारी वाढ विचारात घेता अतिरिक्त वीज निर्मितीची क्षमता वाढवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. ” दलालांच्या मते, सौर उर्जा विरुद्ध पवन उर्जेचे अर्थशास्त्र पाहता भारतात कोळशावर आधारित थर्मल वीज उत्पादन क्षमता किंवा पवन ऊर्जा आधारित अक्षय ऊर्जा निर्मिती क्षमता वाढण्याची कमी आहे.

आर्थिक वर्ष 2020-30 दरम्यान भारत सरकारचे नूतनीकरणक्षम ऊर्जा निर्मिती क्षमतेचे लक्ष्य पाहता आणि सुझलॉन एनर्जी कंपनीची सुधारित आर्थिक स्थिती विचारात घेऊन कोटक फर्मने पुढील काही वर्षांत पवन ऊर्जा आधारित वीज उत्पादन क्षमता वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

सौर ऊर्जा निर्मितीचे सुस्थापित अर्थशास्त्र पाहता भारतातील अक्षय ऊर्जा निर्मितीच्या क्षमतेची वाढ होण्याची शक्यता अधिक आहे. मागील पाच वर्षात भारतातील एकण नूतनीकरणक्षम ऊर्जा निर्मिती क्षमतेमध्ये 75 टक्के वाटा सौर ऊर्जेचा आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE 06 December 2023.