
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने नुकताच 50 रुपये किमतीवर ब्रेकआउट दिला आहे. ॲक्सिस सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांच्या मते, सुझलॉन एनर्जी स्टॉक मजबूत वाढू शकतो. तज्ञांनी स्टॉकमध्ये अल्पकालीन पोझिशनल टारगेट प्राइस 58-60 रुपये निश्चित केली आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना गुंतवणुकदारांना 50 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी सुझलॉन एनर्जी स्टॉक 1.16 टक्क्यांच्या घसरणीसह 52.16 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 1 जुलै 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 0.019 टक्के घसरणीसह 52.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
शेअर बाजारातील तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी निवडलेला दुसरा स्टॉक म्हणजे एनटीपीसी. तज्ञांच्या मते, गुंतवणुकदार हा स्टॉक सध्याच्या किमतीवर खरेदी करू शकतात. मात्र गुंतवणूक करताना 362 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावणे आवश्यक आहे. जर एनटीपीसी स्टॉक 375 रुपये किमतीच्या पार गेला तर शेअर 390 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज सोमवार दिनांक 1 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.37 टक्के घसरणीसह 369.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी निवडलेला तिसरा स्टॉक म्हणजे इंडियन एनर्जी एक्सचेंज. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 0.34 टक्क्यांच्या घसरणीसह 177.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज सोमवार दिनांक 1 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.64 टक्के वाढीसह 188.92 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.