
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर्स चर्चेत येण्याचे मुख्य कारण म्हणजे, सुझलॉन एनर्जी कंपनीने रेनोम एनर्जी सर्व्हिसेस कंपनीचे 76 टक्के भागभांडवल खरेदी करण्याची घोषणा केली आहे. रेनोम एनर्जी सर्व्हिसेस ही कंपनी संजय घोडावत ग्रुपचा भाग आहे. ही कंपनी भारतातील सर्वात मोठी मल्टी-ब्रँड ऑपरेशन्स आणि मेंटेनन्स सर्व्हिस प्रदाता कंपनी आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
या कंपनीच्या देखभाली अंतर्गत 2.5 GW मालमत्ता आहे. यामधे 1,782 MW पवन ऊर्जा, 148 MW सौर ऊर्जा, आणि 572 MW मालमत्ता BOP ग्राहक विभागांमध्ये आहे. 31 मार्च 2024 रोजी संपलेल्या वर्षात या कंपनीची एकूण आर्थिक उलाढाल 213 कोटी रुपये नोंदवली गेली होती. शुक्रवार दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 4.99 टक्के वाढीसह 76.56 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
हे प्रस्तावित संपादन दोन टप्प्यात केले जाणार आहे. त्यात 51 टक्के भागभांडवल किंवा 15,30,000 इक्विटी शेअर्स तीन महिन्यांत अधिग्रहण केले जातील. आणि उरलेले 25 टक्के किंवा 7,50,000 इक्विटी शेअर्स पुढील काळात अधिग्रहण केले जातील. या 22,80,000 इक्विटी शेअर्सच्या व्यवहाराचे मूल्य 660 कोटी रुपये असेल. पहिल्या टप्प्यातील 51 टक्के भाग भांडवल अधिग्रहण करण्यासाठी 400 कोटी रुपये दिले जातील.
मंगळवारी सुझलॉन एनर्जी स्टॉक 2.43 टक्क्यांच्या घसरणीसह 66.26 रुपये किमतीवर पोहचला होता. सुझलॉन एनर्जी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 90,000 कोटी रुपयेवर पोहचले आहे. रेनोम एनर्जी सर्व्हिसेस कंपनीचे संपादन पूर्ण झाल्यावर ही कंपनी सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीची पूर्ण मालकीची उपकंपनी बनेल. या संदर्भात कंपनीच्या संचालक मंडळाने खरेदी करार आणि भागधारकांच्या कराराच्या अंमलबजावणीला मान्यता दिली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.