 
						Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी स्टॉकमध्ये जबरदस्त तेजी निर्माण झाली आहे. मागील काही दिवसापासून या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किट हीट करत आहेत. बुधवारी या कंपनीच्या शेअर्सने 5 टक्के वाढीसह 60 रुपये किंमत पातळी ओलांडली होती. तर आज देखील हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीने जून तिमाहीचे मजबूत निकाल जाहीर केले आहेत. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
सुझलॉन एनर्जी कंपनीला एप्रिल-जून या तिमाही कालावधीत 200 टक्के वाढीसह 300 कोटी रुपये निव्वळ नफा झाला होता. यासोबत कंपनीच्या महसुल संकलनात देखील 50 टक्के वाढ झाली होती. आज गुरूवार दिनांक 25 जुलै 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 4.17 टक्के वाढीसह 63.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मार्च 2023 तिमाहीपासून सुझलॉन एनर्जी कंपनीच्या ऑर्डर बुकमध्ये वाढ पाहायला मिळत आहे.
जून तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीचे मार्जिन 17.5 टक्के होते. मागील वर्षीच्या तुलनेत कंपनीच्या मार्जिनमध्ये 400 बेस पॉइंट्सची वाढ झाली आहे. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विश्वास आहे की, ही कंपनी आपला मार्जिन 17-18 टक्के दरम्यान राखू शकते. सुझलॉन एनर्जी कंपनीने जून तिमाहीची समाप्ती 3.8 GW ऑर्डर बुकसह केली होती. या ऑर्डर्सची पूर्तता पुढील 18-24 महिन्यांत केली जाईल.
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी स्टॉकमध्ये अनेक ब्लॉक डील पाहायला मिळाल्या. यामध्ये कंपनीचे 0.3 टक्के इक्विटी शेअर्स 227 कोटी रुपये मूल्यावर ट्रेड झाले होते. बुधवारी जवळपास 60 रुपये किमतीवर सुझलॉन एनर्जी कंपनीचे 3.8 कोटी शेअर्स ट्रेड झाले होते.
मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 205 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात हा स्टॉक 20 रुपयेवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहचला आहे. मागील पाच वर्षांत सुझलॉन एनर्जी स्टॉक 1400 टक्के मजबूत झाला आहे. या काळात हा स्टॉक 4 रुपयेवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहचला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		