
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने 2023-24 या आर्थिक वर्षात जबरदस्त कामगिरी केली आहे. या काळात कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना बंपर कमाई करून दिली आहे. मार्च 2023 अखेर सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 7.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होत. तर आता या कंपनीचे शेअर्स 27 रुपये किमतीवर पोहचले आहेत.
सुझलॉन एनर्जी कंपनीवर लक्ष ठेवणाऱ्या तज्ज्ञांच्या मते, कंपनीने आपले कर्ज कमी केल्याने गुंतवणूकदारांनी स्टॉकमध्ये खरेदी वाढवली आहे. तसेच या कंपनीला विविध कंपन्यांकडून नवीन नवीन ऑर्डर प्राप्त झाल्या आहेत. आज सोमवार दिनांक 9 ऑक्टोबर 2023 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 4.64 टक्के घसरणीसह 27.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने मागील सहा महिन्यात जबरदस्त उसळी नोंदवली आहे. या कंपनीने मागील सहा महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना 238 टक्के नफा कमावून दिला आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीने आपले कर्ज कमी केल्यानंतर, गुंतवणूकदारांनी या स्टॉकवर अधिक विश्वास व्यक्त केला आहे. शेअर बाजारातील विविध ब्रोकरेज कंपन्यानी गुंतवणुकदारांना सुझलॉन एनर्जी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
सुझलॉन कंपनीचे शेअर्स सध्या अप ट्रेंडमध्ये व्यवहार करत आहेत. तज्ज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 40 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. तज्ञांनी सुझलॉन एनर्जी स्टॉकमध्ये पैसे लावताना गुंतवणूकदारांना 25 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी स्टॉक 29.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 6 महिन्यांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने लोकांचे पैसे 244 टक्क्यांपेक्षा जास्त वाढवले आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.