 
						Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये सध्या वाढीचे संकेत मिळत आहेत. कारण सन फार्मा कंपनीचे प्रवर्तक दिलीप सांघवी आणि त्यांच्या सहयोगी कंपन्यांनी फेब्रुवारी 2020 मध्ये स्वाक्षरी केलेला सुधारित भागधारकांचा करार रद्द करण्याची घोषणा केली आहे.
26 सप्टेंबर 2023 रोजी या कराराची मुदत संपल्यानंतर सुझलॉन एनर्जी कंपनीच्या संचालक मंडळातील गुंतवणूकदार समूहातर्फे नियुक्त करण्यात आलेले संचालक हितेन तिंबडिया यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन पडत्याग केला आहे. आज गुरूवार दिनांक 28 सप्टेंबर 2023 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 0.58 टक्के वाढीसह 25.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
जून 2023 तिमाहीच्या शेअर होल्डिंगच्या डेटानुसार दिलीप सांघवी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुझलॉन एनर्जी कंपनीचे 7.4 टक्के भाग भांडवल धारण केले होते. मात्र आता त्यांचा करार संपुष्टात येत असल्याने कंपनीच्या कामकाजावर कोणताही परिणाम होणार नाही, असे स्पष्टीकरण सुझलॉन एनर्जी कंपनीने दिले आहे.
दिलीप सांघवी यांनी देखील स्वतंत्र निवेदन जारी कडून माहिती दिली आहे की, त्यांचा शेअर धारक करार रद्द करण्यात आला आहे, मात्र ते कंपनीच्या सहयोगी कंपनीमध्ये गुंतवणूकदार म्हणून राहणार आहेत.
फेब्रुवारी 2020 मध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीच्या संचालक मंडळाने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या जून 2019 च्या परिपत्रकांतर्गत सुझलॉन एनर्जी कंपनी आणि तिच्या उपकंपन्यासाठी कर्ज पुनर्रचना प्रस्तावाला मंजूरी दिली होती. या अंतर्गत कंपनीने 1,000 कोटी रुपये भांडवल उभारणी केली होती. यातील काही पैसे संघवी फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड, आदित्य मेडिसेल्स लिमिटेड आणि दिलीप संघवी यांच्या संस्थांकडून जमा करण्यात आली होती. 2015 मध्ये, सन फार्मा कंपनीच्या प्रवर्तकांनी सुझलॉन एनर्जी कंपनीचे 23 टक्के भाग भांडवल 1,800 कोटी रुपयेमध्ये खरेदी केले होते.
सुझलॉन एनर्जी कंपनी आता पूर्णपणे कर्जमुक्त कंपनी म्हणून व्यवसाय करत आहे. अशा परिस्थितीत ही कंपनी आता संचालक मंडळात नवीन बदल करु इच्छित आहे. कंपनीने लोकांकडून कर्ज घेतले होते, त्यांच्या प्रतिनिधीना आता संचालक मंडळमधून काढले जात आहे. त्यांच्या जागी सुझलॉन एनर्जी कंपनी आता आपल्या लोकांना संचालक मंडळात सामील करणार आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीने मागील काही काळात मोठ्या ऑर्डर मिळवल्या आहेत. आणि कंपनी कर्जमुक्त देखील झाली आहे. अशा परिस्थितीत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त वाढ होऊ शकते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		