
Suzlon Share Price | मंगळवार, 07 जानेवारी 2025 रोजी देशांतर्गत स्टॉक मार्केटमध्ये मजबूत तेजी दिसून आली होती. बीएसई सेन्सेक्स 300 अंकांनी वाढून 78,344 वर पोहोचला होता. तर एनएसई निफ्टी सुद्धा 149 अंकांनी वाढून 23,763 वर पोहोचला होता. दुसरीकडे, २०२४ मधील दमदार तेजीनंतर सध्याच्या घसरणीमुळे सुझलॉन एनर्जी मल्टीबॅगर शेअरमध्ये अजून घसरण होणार आहे का, असा प्रश्न गुंतवणूकदारांना सतावतो आहे.
सुझलॉन एनर्जीचा शेअर त्याच्या 5-दिवस, 10-दिवस, 20-दिवस, 30-दिवस, 50-दिवस, 100-दिवस, 150-दिवस आणि 200-दिवसांच्या मूव्हिंग सरासरीपेक्षा कमी ट्रेड करत आहे, जे शॉर्ट टर्म आणि लॉन्ग टर्ममध्ये घसरणीचे संकेत आहेत. आता स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत दिले आहेत.
सुझलॉन एनर्जी शेअरची सध्याची स्थिती
मंगळवार, 07 जानेवारी 2025 रोजी सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर 3.84 टक्क्यांनी वाढून 61.11 रुपयांवर पोहोचला होता. सुझलॉन एनर्जीर लिमिटेड कंपनीचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 86.04 रुपये होता आणि 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 35.50 रुपये होता. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 83,118 कोटी रुपये आहे.
सुझलॉन एनर्जी शेअरबाबत तज्ज्ञांचा सल्ला
सुझलॉन एनर्जी शेअर्स गुंतवणूकदारांनी नकारात्मक संकेत लक्षात घेऊन 54 रुपयांवर स्टॉपलॉस ठेवावा असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. सुझलॉन एनर्जी शेअरने ६६ रुपयांची पातळी ओलांडल्यास खरेदीचा विचार करावा.
सेबीचे नोंदणीकृत स्टॉक मार्केट विश्लेषक ए. आर. रामचंद्रन सुझलॉन शेअरबाबत सल्ला देताना म्हणाले की, ‘सुझलॉन एनर्जी शेअर डेली चार्टवर घसरणीचे संकेत देत आहे. सुझलॉन शेअर ५९.५ रुपयांच्या खाली घसरल्यास पुढे तो ५३.४ रुपयांपर्यंत घसरू शकतो असा अंदाज व्यक्त केला आहे.
सुझलॉन एनर्जी शेअरने किती परतावा दिला
मागील ५ दिवसात सुझलॉन एनर्जी कंपनी शेअर 4.05% घसरला आहे. मागील १ महिन्यात सुझलॉन एनर्जी कंपनी शेअर 9.59% घसरला आहे. मागील ६ महिन्यात या शेअरने 10.33% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात सुझलॉन एनर्जी शेअरने 42.96% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनी शेअरने 2,448.12% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्म मध्ये हा शेअर 50.79% घसरला आहे. तसेच YTD आधारावर सुझलॉन एनर्जी कंपनी शेअर 4.38% घसरला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.