
Adani Power Share Price | मंगळवार, 07 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली होती. परंतु, नंतर शेअर बाजारात घसरण दिसू लागली होती. 7 जानेवारीला सकाळी तेजी पाहायला मिळाली आणि दुपारी शेअर बाजार पुन्हा रेड झोनमध्ये ट्रेड करत होता. मात्र काही वेळातच स्टॉक मार्केटमध्ये पुन्हा तेजी दिसू लागली होती. स्टॉक मार्केटमधील या उतार-चढावाच्या दरम्यान अदानी पॉवर लिमिटेड कंपनीचा शेअर फोकसमध्ये आला आहे.
उडुपी पॉवर कॉर्पोरेशन आणि पंजाब राज्य डिस्कॉम यांच्यातील २००६ च्या वीज खरेदी कराराला मान्यता देण्यास पंजाब राज्य विद्युत नियामक आयोगाने (पीएसईआरसी) नकार दिल्याच्या विरोधात अदानी पॉवर लिमिटेड कंपनीने केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सहमती दर्शविल्यानंतर मंगळवारी अदानी पॉवर कंपनी शेअर्स फोकसमध्ये आला आहे.
न्यायमूर्ती पी. एस. नरसिम्हा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने अदानी पॉवरच्या याचिकेवर पंजाब राज्य विद्युत नियामक आयोग (पीएसईआरसी) आणि पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशन (पीएसपीसीएल) यांना नोटीस बजावली आहे. या अपडेटयानंतर अदानी पॉवर लिमिटेड कंपनी शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाले.
अदानी पॉवर शेअरची सध्याची स्थिती
मंगळवार, 07 जानेवारी 2025 रोजी अदानी पॉवर लिमिटेड कंपनी शेअर 2.81 टक्क्यांनी वाढून 512.30 रुपयांवर पोहोचला होता. अदानी पॉवर लिमिटेड कंपनीचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 895.85 रुपये होता आणि 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 432 रुपये होता. अदानी पॉवर लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 1,97,822 कोटी रुपये आहे.
अदानी पॉवर शेअरने किती परतावा दिला
मागील ५ दिवसात अदानी पॉवर कंपनी शेअर 4.06% घसरला आहे. मागील १ महिन्यात अदानी पॉवर कंपनी शेअर 4.40% घसरला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 26.61% घसरला आहे. मागील १ वर्षात अदानी पॉवर शेअर 5.43% घसरला आहे. मागील ५ वर्षात अदानी पॉवर कंपनी शेअरने 737.09% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्म मध्ये या शेअरने 396.66% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर अदानी पॉवर कंपनी शेअर 4.06% घसरला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.