
Talbros Share Price | मागील काही आठवड्यापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळत होती, या तेजीला शुक्रवारी ब्रेक लागला. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजार जोरात आपटला. मात्र दुसरीकडे टॅल्ब्रोस ऑटोमोटिव्ह कंपोनंट्स कंपनीचे शेअर्स जबरदस्त वेगात धावत होते.
शुक्रवार दिनांक 21 जुलै 2023 रोजी टॅल्ब्रोस ऑटोमोटिव्ह कंपोनंट्स कंपनीचे शेअर्स 9 टक्क्यांच्या वाढीसह 863 रुपये किमतीवर पोहोहले होते. तर दिवसा अखेर हा स्टॉक 7.45 टक्के वाढीसह 853.00 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
स्टॉक वाढीचे कारण :
टॅल्ब्रोस ऑटोमोटिव्ह कंपोनंट्स कंपनीने दिलेल्या माहितीनुसार 8 ऑगस्ट 2023 रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनीनी आपले जून 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करणार आहे. या बैठकीत कंपनी आपले 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स विभाजित करण्याचा निर्णय देखील घेऊ शकते. ज्या लोकांनी 28 मार्च 2023 रोजी टॅल्ब्रोस ऑटोमोटिव्ह कॉम्पोनंट्स कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 119 टक्क्यांनी वाढले आहे.
मागील एका महिन्यात टॅल्ब्रोस ऑटोमोटिव्ह कंपोनंट्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 23 टक्के नफा कमावून दिला आहे. ज्या गुंतवणूकदारानी 6 महिन्यांपूर्वी टॅल्ब्रोस ऑटोमोटिव्ह कंपोनंट्स कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 70 टक्क्यांनी वाढले आहे. मागील एका वर्षात टॅल्ब्रोस ऑटोमोटिव्ह कंपोनेंट्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 63 टक्के परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.