
Tanla Platforms Share Price| तानला प्लॅटफॉर्म्स या आयटी क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान खरेदी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 16 टक्के वाढीसह 963.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका महिन्यात तानला प्लॅटफॉर्म्स कंपनीचे शेअर्स 49 टक्के मजबूत झाले आहेत.
15 मे 2023 रोजी तानला प्लॅटफॉर्म्स कंपनीचे शेअर्स 672.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जे आज 1000 रुपयेच्या पार गेले आहेत. आज बुधवार दिनांक 14 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.98 टक्के वाढीसह 1,001.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मागील 10 वर्षात तानला प्लॅटफॉर्म्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 31500 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 10 वर्षापूर्वी ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 3 कोटीपेक्षा अधिक झाले आहेत. 26 जुलै 2013 रोजी तानला प्लॅटफॉर्म्स कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 3.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
तानला प्लॅटफॉर्म्स कंपनीचे शेअर्स आज 1000 रुपयेच्या वर ट्रेड करत आहेत. या कालावधीत तानला प्लॅटफॉर्म्स कंपनीच्या शेअर्स लोकांना 31500 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 26 जुलै 2013 रोजी तानला प्लॅटफॉर्म्स कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 3.1 कोटी रुपये झाले असते.
मागील 5 वर्षात तानला प्लॅटफॉर्म्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 3,259.36 टक्के परतावा कमावून दिला आहे. 15 जून 2018 रोजी तानला प्लॅटफॉर्म्स कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 29.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 13 जून 2023 रोजी हा स्टॉक बीएसई इंडेक्सवर 963.80 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. जर तुम्ही 5 वर्षांपूर्वी तानला प्लॅटफॉर्म्स कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 32.18 लाख रुपये झाले असते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.