13 December 2024 1:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

केंद्रीय गृहमंत्रालयाने या क्षेत्रांना लॉकडाऊनमधून वगळले, सविस्तर यादी

Covid19, Corona Crisis

नवी दिल्ली, १७ एप्रिल: भारतामध्ये कोरोना विषाणूचा वेग हळूहळू मंदावत चालला आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येतील वाढ कमी झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या १२ तासांमध्ये कोरोनाचे ६२८ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर १७ रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर गुरुवारी २२ जणांचा मृत्यू झाला होता. अशात शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार कोरोनाबाधितांचा आकडा कमी झाला आहे.

देशभरातल्या ३२५ जिल्ह्यांमध्ये करोनाचा शिरकाव झालेला नाही अशी माहिती केंद्राच्या आरोग्य विभागाने दिली आहे. देशाच्या दृष्टीने ही महत्त्वाची बाब आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. काही वेळापूर्वी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ३ मेपर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेशी आमची चर्चा झाली असंही आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं.

दरम्यान, केंद्रीय गृह मंत्रालयाने शुक्रवारी जारी केलेल्या निर्देशांमध्ये आणखी काही क्षेत्रांना लॉकडाऊनच्या निर्बंधातून वगळले आहे. कृषि, बांधकाम आणि बँकिंग या क्षेत्रांचा यामध्ये समावेश आहे. सरकारकडून या संदर्भात सविस्तर आदेश जारी करण्यात आले आहेत. २० एप्रिलनंतरच ही सूट लागू होईल.

कोणकोणत्या कामांना लॉकडाऊनमध्ये परवानगी देण्यात आली आहे.

१. आदिवासी लोकांकडून केली जाणारी शेती, कृषि लागवड, पिकांची कापणी. बांबू, नारळ, कोको, मसाल्याचे पदार्थ, पोफळी यांच्यावरील प्रक्रिया, पॅकेजिंग, वाहतूक यांना लॉकडाऊनमधून सूट देण्यात आली आहे.

२. अबँकिंग वित्तीय संस्थांचे कामकाज, गृह वित्त पुरवठा कंपन्या, सूक्ष्म वित्त पुरवठा कंपन्या यांना कमीत कमी कर्मचाऱ्यांसह कामकाज सुरू करण्याला मंजुरी देण्यात आली आहे.

३. ग्रामीण भागातील बांधकामे सुरू करण्याला मंजुरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर पाणी पुरवठ्यासाठी पाईप टाकणे तसेच दूरसंचार कंपन्यांसाठी जमिनीखालील लाईन्स टाकणे यांनाही परवानगी देण्यात आली आहे.

 

News English Summary: The corona virus in India is slowly slowing down. There has been a decrease in the number of coronas in the country. According to the latest data from the Ministry of Health, in the last 12 hours 628 new coronary patients have been found. While 17 patients died during treatment. On Thursday, 22 people were killed. Thus, the data released on Friday showed the number of corona affected peoples declining.

News English Title: Story list of New activities exempted by government from lockdown restrictions Covid19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x