
TARC Share Price | शेअर बाजारात बिग बूल या नावाने प्रसिद्ध असलेले दिवंगत गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी TARC कंपनीचे शेअर्स खरेदी करून जबरदस्त नफा कमावला आहे. अवघ्या तीन महिन्यांत TARC कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांचे पैसे जवळपास डबल केले आहेत.
ज्या गुंतवणूकदारांनी तीन महिन्यांपूर्वी TARC लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करून होल्ड केले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य दोन लाख रुपये झाले आहेत. आज शुक्रवार दिनांक 23 जून 2023 रोजी TARC कंपनीचे शेअर्स 0.71 टक्के घसरणीसह 62.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
TARC लिमिटेड ही कंपनी द अनंत राज कॉर्पोरेशन लिमिटेड या नावाने ओळखली जाते. ही कंपनी भारतातील सर्वात मोठी रिअल इस्टेट डेव्हलपर कंपनी म्हणून ओळखली जाते. TARC ही कंपनी गृहनिर्माण, व्यावसायिक, आदरातिथ्य, शैक्षणिक संस्था, मनोरंजन सुविधा, हॉटेल, रिसॉर्ट आणि पायाभूत सुविधा प्रकल्प या क्षेत्रात व्यवसाय करते. TARC कंपनीचे मुख्य कार्यालय दिल्ली मध्ये स्थित आहे. तर TARC लिमिटेड कंपनीला अनेक प्रकल्पांची निर्मिती करण्यासाठी सर्वोत्कृष्ट विकासक पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला आहे.
TARC लिमिटेड कंपनीचे शेअर्स 27 फेब्रुवारी 2023 रोजी 102 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर 14 जून 2023 या कंपनीच्या शेअरने 172.35 रुपये ही आपली वार्षिक उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 168.15 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. TARC कंपनीच्या स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 172.35 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 44.25 रुपये होती. रेखा झुनझुनवाला यांनी देखील TARC कंपनीचे शेअर्स खरेदी केले आहेत.
तब्बल 10 वर्ष TARC कंपनीचे शेअर्स मंदीच्या गर्तेत अडकले होते. मात्र 2021 मध्ये TARC कंपनीचे शेअर्स तेजीत आले. 30 डिसेंबर 2021 रोजी, TARC कंपनीचे शेअर्स 74.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. NSE BSE च्या वेबसाईटवर उपलब्ध आकडेवारीनुसार, राकेश झुनझुनवाला यांनी TARC कंपनीचे एक कोटी इक्विटी शेअर्स होल्ड केले होते. 24 डिसेंबर 2020 रोजी टॉर्क लिमिटेड कंपनीचे शेअर्स 20 रुपयांवर ट्रेड करत होते. या किंमत पातळीपासून आतापर्यंत गुंतवणूकदारांनी तब्बल 200 टक्के नफा कमावला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.