
Tata Group Stock | 10 नोव्हेंबर 2022 रोजी ट्रेडिंग सेशनमध्ये सुरुवातीच्या काही तासात टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 3.5 टक्क्यांहून जास्त कमजोर झाले होते. या दिग्गज ऑटो कंपनीने बुधवारी आपले सप्टेंबर 2022 तिमाहीचे निकाल जाहीर करताच, स्टॉक मध्ये कमालीची घसरण पाहायला मिळाली होती. टाटा मोटर्स कंपनीने सप्टेंबर 2022 तिमाहीच्या निकालात 945 कोटींचा तोटा जाहीर केला आहे. मात्र, कंपनीच्या महसुलात 30 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती.
तिमाही निकाल जाहीर केल्यानंतर बहुतेक ब्रोकरेज हाऊसनी टाटा मोटर्स कंपनीचे स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला दिला होता. टाटा मोटर्स कंपनीचा शेअर आपल्या गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर परतावा देणारा स्टॉक ठरला असून त्याने मागील 2 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 200 टक्क्यांहून जास्त मग कमावून दिला आहे. मात्र 2022 या चालू वर्षांत आतापर्यंत हा स्टॉक 17 टक्क्यांनी कमजोर झाला आहे.
शेअरसाठी पुढील रणनीती :
ब्रोकरेज हाऊस Edelweiss फर्मने टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सवर तेजीचा अंदाज व्यक्त केला असून स्टॉकसाठी ‘बाय’ रेटिंग देऊन 502 रुपयेच्या टार्गेट प्राईससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. 2022 च्या दुसऱ्या तिमाहीत JLR ची कामगिरी भारताच्या व्यवसायापेक्षा अनेक पटींनी चांगली असल्याचे ब्रोकरेजने म्हंटले आहे. या कंपनीचा एबिटा अपेक्षेपेक्षा चांगला होता. टाटा मोटर्स कंपनीने SUV व्यवसायासाठी नजीकच्या काळात दोन अंकी मार्जिनचे लक्ष्य निर्धारित केले आहे. प्रवासी वाहन सेगमेंट मजबूत होत आहे. एस सिक्युरिटीज फर्मने टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सवर 534 रुपयेची टार्गेट प्राईस दिली असून स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
जेपी मॉर्गन या दिग्गज बहुराष्ट्रीय गुंतवणूक कंपनीने टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सबद्दल ‘तटस्थ’ असल्याचे म्हंटले आहे. जेपी मॉर्गनने शेअरसाठी टार्गेट प्राईस 410 वरून 455 रुपये पर्यंत निश्चित केली आहे. ब्रोकरेज फर्मने आर्थिक वर्ष FY2023-2024 साठी एकत्रित EPS मध्ये 12 ते 15 टक्क्यांची कपात केली आहे. JLR ची दुसऱ्या तिमाहीतील घाऊक विक्री निराशाजनक राहिली होती, मात्र त्यांची किरकोळ विक्रीचे प्रमाण चांगले होते. या कंपनीने आर्थिक वर्ष 2025 पर्यंत शून्य निव्वळ कर्जाचे लक्ष्य निश्चित केले आहे. मॉर्गन स्टॅन्लीने टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 502 रुपयांच्या टार्गेट किमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला असून जेफरीजने 540 रुपये लक्ष किंमत दिली आहे.
शेअर्स गडगडले :
टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4.6 टक्क्यांनी गडगडले होते. 30 सप्टेंबर 2022 रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत टाटा मोटर्स कंपनीला 898 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा सहन करावा लागला होता. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बाजार उघडल्यानंतर टाटा मोटर्स कंपनीने आपले तिमाही निकाल जाहीर केले आणि स्टॉक मध्ये पडझड सुरू झाली होती.
बीएसई निर्देशांकावर टाटा मोटर्स कंपनीचा शेअर 4.68 टक्क्यांनी कमजोर झाला होता, आणि शेअरची किंमत 412.75 रुपयांवर आली होती. एनएसई निर्देशांकावर टाटा मोटर्स कंपनीचा शेअर 4.69 टक्क्यांनी पडला होता, आणि शेअरची किंमत 412.85 रुपयांवर आली होती. दरम्यान, टाटा मोटर्स कंपनीने 30 सप्टेंबर 2022 रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाहीच्या निकालात 898 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला असल्याचे म्हंटले आहे. भारतातील या दिग्गज स्वदेशी वाहन निर्मिती कंपनीला मागील 2021 च्या आर्थिक वर्षात जुलै-सप्टेंबर या तिमाही कालावधीत 4416 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा सहन करावा लागला होता. मात्र, समीक्षाधीन कालावधीत टाटा मोटर्स कंपनीने 80,650 कोटी रुपये महसुल कमावला होता,जो मागील वर्षी 62,246 कोटी रुपये होता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.