1 May 2025 12:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

Tata Investment Share Price | टाटा ग्रुपचा हा शेअर कुबेर खजिना ठरतोय, शेअरची पुढची टार्गेट प्राईस मालामाल करेल

Tata Investment Share Price

Tata Investment Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी जबरदस्त विक्री पाहायला मिळाली होती. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.28 टक्के घसरणीसह 6814.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. त्यापूर्वी सलग सात दिवस या कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली होती. मागील सात ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 36.15 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील आठवड्यात गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे शेअर्स 9.86 टक्क्यांच्या वाढीसह 7,115 रुपये या आपल्या वार्षिक उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. मागील एका वर्षात टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 250 टक्के परतावा कमावून दिला आहे. सेबीने टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स स्टॉक एक्सचेंज मॉनिटरिंग म्हणजेच दीर्घकालीन ASM संरचने अंतर्गत ठेवले आहे.

टाटा इन्व्हेस्टमेंट कंपनीने डिसेंबर 2023 तिमाहीत निव्वळ नफ्यात मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 54.19 टक्के वाढ नोंदवली आहे. डिसेंबर तिमाहीत या कंपनीने 53.24 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 34.53 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

मागील वर्षी डिसेंबर तिमाहीत टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने 37.66 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर या तिमाहीत कंपनीच्या महसूल संकलनात वार्षिक आधारे 34.53 टक्के वाढ झाली आहे. डिसेंबर 2023 तिमाहीत कंपनीने 50.55 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे.

आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स फर्मच्या तज्ञांच्या मते, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन स्टॉकमध्ये 6700 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट पाहायला मिळत आहे. तर ब्रेकआउट लेव्हल 7000 रुपये किमतीवर आहे. म्हणजेच 7000 रुपयेच्या पार गेला तर हा स्टॉक 7200 रुपये किंमत स्पर्श करू शकतो.

टिप्स 2 ट्रेड्स फर्मच्या तज्ञांच्या मते, टाटा इन्व्हेस्टमेंट स्टॉक मजबूत वाढीचे संकेत देत आहे. डीआरएस फिनवेस्ट फर्मच्या मते, हा कंपनीचे शेअर्स पुढील काळात 7,500 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. मात्र गुंतवणूकदारांनी पैसे लावताना 6,500 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावला पाहिजे.

टाटा सन्सचा भाग असलेली टाटा इन्व्हेस्टमेंट कंपनी ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोंदणीकृत असलेली नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी म्हणून ओळखली जाते. हा कंपनीचे जुने नाव द इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया असे होते. ही कंपनी प्रामुख्याने दीर्घकालीन गुंतवणुक, इक्विटी शेअर्स आणि इक्विटी संबंधित सिक्युरिटीज यांसंबंधित गुंतवणूकीचा व्यवसाय करते. डिसेंबर 2023 पर्यंत कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे 73.38 टक्के भाग भांडवल धारण केले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Investment Share Price NSE Live 26 February 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Tata Investment Share Price(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या