
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सने मागील पाच वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 400 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील काही काळापासून टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सने जबरदस्त कामगिरी केली आहे. मात्र आता हा स्टॉक सतायत्ने वाढून थकला आहे. म्हणून या स्टॉकच्या टेक्निकल चार्टमध्ये घसरणीचे संकेत मिळत आहेत. शुक्रवार दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी टाटा मोटर्स स्टॉक 0.37 टक्के घसरणीसह 1,007.85 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. ( टाटा मोटर्स कंपनी अंश )
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स किंचित घसरणीसह 1010 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा मोटर्स स्टॉक दैनिक टेक्निकल चार्टवर हँगिंग मॅन कँडल तयार करत होता. हँगिंग मॅन कॅन्डल ही तेजीच्या विरुद्ध मानली जाते. याचा अर्थ, जर एखादा स्टॉक अपट्रेंडमध्ये वाढत असेल आणि त्यात हँगिंग मॅन कॅन्डल तयार झाली तर शेअरमध्ये घसरण पाहायला मिळू शकते. सध्या हे टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरबाबत पाहायला मिळत आहे. हँगिंग मॅन कँडल स्टिक शेअरच्या दैनिक चार्तवर अपट्रेंड दरम्यान तयार होत असते. एक प्रकारे, हा पॅटर्न शेअर्सच्या अपट्रेंड किमतीत घसरणीचे संकेत देत असतो.
मागील काही महिन्यांमध्ये टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने तेजी पाहायला मिळत होती. मात्र आता स्टॉक चार्टमध्ये घसरणीचे संकेत मिळत आहेत. टाटा मोटर्स स्टॉकमध्ये पुढील काळात नफा वसुली पाहायला मिळू शकते. टाटा मोटर्स स्टॉकच्या दैनिक चार्टवर हँगिंग मॅन कँडल शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सक्रिय झाली होती.
मागील एका वर्षात टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 130.29 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 61.92 टक्के वाढली आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 27.48 टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 0.96 टक्के घसरली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.