
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सने 2023 या वर्षात अद्भुत कामगिरी केली आहे. 2023 या वर्षात टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स तब्बल 100 टक्के वाढले आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा मोटर्स स्टॉक 7 टक्के वाढीसह 802.60 रुपये आपल्या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता. जानेवारी 2023 मध्ये टाटा मोटर्स स्टॉक 390 रुपये किमतीवर ट्रेड करत होता.
मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 103 टक्के परतावा कमावून दिला आहे. इतक्या प्रचंड तेजीनंतर देखील टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स अजूनही हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहेत. टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सचा आढावा घेणाऱ्या 35 तज्ञापैकी 28 तज्ञांनी स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी टाटा मोटर्स स्टॉक 3.38 टक्के वाढीसह 779.40 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
शेअरखान फर्मने नुकताच जाहीर केलेल्या अहवालात टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सची टार्गेट प्राइस 840 रुपये निश्चित केली आहे. तज्ज्ञांच्या मते टाटा मोटर्स कंपनीचा भाग असलेल्या जॅग्वार लँड रोव्हर विभाग आर्थिक वर्षाच्या उर्वरित भागात मजबूत कामगिरी करेल, आणि त्यामुळे कंपनीच्या कर्जात कपात होईल सोबत प्रवासी वाहनांच्या EBITDA मार्जिनमध्ये सुधारणा पाहायला मिळेल.
सणासुदीच्या काळात झालेल्या मजबूत विक्रीमुले कंपनीच्या PV विभागात चांगली वाढ पाहायला मिळेल. तर स्थानिक CV आणि PV व्यवसाय आर्थिक वर्ष 2023-24 च्या तिसऱ्या तिमाहीत चांगली कामगिरी करेल.
ब्रोकरेज फर्मच्या मते, टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत मिळत आहेत. कारण टाटा मोटर्स कंपनीने ईव्ही सेगमेंटमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता ही कंपनी हायड्रोजन स्पेसमध्ये देखील मजबूत कामगिरी करत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी भारत पुढील सात वर्षांत 8 लाख डिझेल बस ऐवजी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्याची योजना आखत आहे. या नवीन योजनेमुळे कंपनीच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत वाढ होण्याची शक्यता आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.