
Tata Motors Share Price | शुक्रवारी सकारात्मक संकेतांमुळे शेअर बाजारात मोठी तेजी पाहायला मिळाली होती. आठवड्याच्या शेवटी शेअर बाजाराचा बीएसई सेन्सेक्स २२६ अंकांनी वधारून बंद झाला होता. तसेच निफ्टीने सुद्धा २३,८०० चा टप्पा पार केला होता. दरम्यान, ब्रोकरेज फर्म डीएएम कॅपिटलने ईटी नाऊ स्वदेश वृत्त वाहिनीशी बोलताना टाटा मोटर्स शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. (टाटा मोटर्स कंपनी अंश)
टाटा मोटर्स शेअरची सध्याची स्थिती
शुक्रवार, 27 डिसेंबर 2024 रोजी टाटा मोटर्स शेअर 1.78 टक्के वाढून 754 रुपयांवर पोहोचला होता. टाटा मोटर्स कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 1,179 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 717.70 रुपये होता. टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 2,76,268 कोटी रुपये आहे.
टाटा मोटर्स शेअरसाठी टार्गेट प्राईस
डीएएम कॅपिटल ब्रोकरेज फर्मने टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ कॉल दिला आहे. डीएएम कॅपिटल ब्रोकरेज फर्मने टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला देताना 870 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते टाटा मोटर्स शेअर्स मागील काही महिन्यात घसरला असला तरी पुढे मोठा परतावा मिळेल असा अंदाज व्यक्त केला आहे.
टाटा मोटर्स शेअरने मल्टिबॅगर परतावा दिला
मागील ५ दिवसात टाटा मोटर्स शेअरने 1.13% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात टाटा मोटर्स शेअर 3.27% घसरला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 23.82% घसरला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 0.01% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात टाटा मोटर्स शेअरने 328.04% परतावा दिला आहे. YTD आधारावर शेअरने 4.63% परतावा दिला आहे. तर लॉन्ग टर्ममध्ये टाटा मोटर्स शेअरने गुंतवणूकदारांना 2,276 टक्के परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.