
Tata Motors Share Price| टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरची किंमत गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 576.55 रुपये या 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांक किमतीवर पोहचले होते. टाटा मोटर्स कंपनीने आपल्या नफ्यावर लक्ष केंद्रित केल्याने आणि भारतीय व्यवसाय आणखी मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केल्यानंतर कंपनीचे शेअर्स तेजीत आला आहेत.
टाटा मोटर्स शेअर्सची आजची किंमत
टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स मागील सात ट्रेडिंग सेशनपासून वाढत आहेत. आज शुक्रवार दिनांक 9 जून 2023 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 0.54 टक्के वाढीसह 562.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील पाच दिवसात टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 3.80 टक्के मजबूत झाले आहेत.
टाटा मोटर्स स्टॉकवर बाय रेटिंग
टाटा मोटर्स स्टॉकमधील तेजीमुळे शेअर बाजारातील तज्ञ स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने टाटा मोटर्स स्टॉकवर बाय रेटिंग दिली आहे. ब्रोकरेज फर्मने बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इन्व्हेस्टर डे मीटिंग दरम्यान टाटा मोटर्स स्टॉक बाबत आपले मत व्यक्त केले होते. यानंतर जेफरीज, सीएलएसए, मॉर्गन स्टॅनले, नोमुरा, मोतीलाल ओसवाल, आणि नुवामा यांसह अनेक ब्रोकरेज फर्मने टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे.
भारतातील प्रमुख ब्रोकरेज कंपन्यांनी टाटा मोटर्स स्टॉकबाबत आपले मत व्यक्त केले आहेत. CLSA ने टाटा मोटर्स कंपनीच्या स्टॉकवर 624 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. मॉर्गन स्टॅनलीने टाटा मोटर्स स्टॉकवर ओव्हरवेट रेटिंग देऊन स्टॉक 617 रुपये लक्ष किमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मला विश्वास आहे की टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा आयपीओ टाटा मोटर्स कंपनीसाठी फायदेशीर ठरेल.
टाटा टेक कंपनीचा आयपीओ
टाटा टेक कंपनीचा आयपीओ टाटा मोटर्स कंपनीला कर्ज कमी करण्यात मदत करेल. नोमुरा फर्मने टाटा मोटर्स स्टॉकवर 610 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. प्रवासी वाहन आणि व्यावसायिक वाहन विभागांमध्ये तज्ञांनी आणखी वाढीची शक्यता व्यक्त केली आहे. मोतीलाल ओसवाल फर्मने या स्टॉकवर 650 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. तर नुवामा फर्मने 645 रुपये लक्ष किंमतसह टाटा मोटर्स स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.