15 December 2024 7:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Paytm Share Price | पेटीएम शेअर्स तेजीत येणार, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस, वेळीच फायदा उचला

Highlights:

  • Paytm Share Price
  • पेटीएम शेअरची सध्याची किंमत
  • पेटीएम स्टॉकबाबत तज्ञांचे मत
Paytm Share Price

Paytm Share Price | पेटीएम कंपनीची मुख्य कंपनी ‘वन 97 कम्युनिकेशन्स’ च्या शेअरमध्ये मागील काही महिन्यांपासून तेजी पाहायला मिळत आहे. मागील सहा महिन्यांपासून पेटीएम कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 47.10 टक्के परतावा कमावून दिला आहे. डिसेंबर 2022 पासून पेटीएम कंपनीचे शेअर्स उत्कृष्ट कामगिरी करत आहेत.

पेटीएम शेअरची सध्याची किंमत

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पेटीएम कंपनीचे शेअर्स 8 टक्क्यांच्या वाढीसह 785.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. दिवसा अखेर हा स्टॉक 6.05 टक्क्यांच्या वाढीसह 771 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज शुक्रवार दिनांक 9 जून 2023 रोजी पेटीएम कंपनीचे शेअर्स 3.77 टक्के वाढीसह 801.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

पेटीएम स्टॉकबाबत तज्ञांचे मत

पेटीएम कंपनीने मे महिन्याचे बिझनेस अपडेट नुकताच जारी केले आहेत. मार्च 2023 च्या तिमाहीत कंपनीची कामगिरी अपेक्षेपेक्षा चांगली असल्यामुळे तज्ञांनी पेटीएम स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी मे 2026 बिझनेस अपडेट विचारात घेऊन पेटीएम स्टॉकवर 900 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. पेटीएम कंपनीचे सकल व्यापारी मूल्य एप्रिल-मे 2023 मध्ये म्हणजे दोन महिन्यांत मजबूत राहिले आहेत.

वार्षिक आधारावर कंपनीचा सकल व्यापारी मूल्य 35 टक्क्यांच्या वाढीसह 2.65 लाख कोटी रुपये नोंदवले गेले आहे. पेटीएम कंपनीच्या कर्ज वितरणात वाढ पाहायला मिळत आहे. पेटीएम कंपनीने सध्या कर्जा वाटप करण्यासाठी सात वित्तीय संस्थांसोबत भागीदारी केली असून चालू आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये आणखी तीन ते चार कर्जदाते जोडण्याचा प्रयत्न करत आहे.

पेटीएम कंपनीच्या बिझनेस अपडेटच्या आधी 2 जून 2023 रोजी ग्लोबल ब्रोकरेज फर्म CLSA फर्मने म्हंटले होते की, पेटीएम कंपनीच्या कर्ज व्यवसायात वाढ पाहायला मिळत आहे. मागील आठ तिमाहींमध्ये पेटीएम कंपनीचे तिमाही रन रेट वितरण 12,000 कोटी रुपयांच्या स्तरावरून वाढले आहेत. मागील काही तिमाहींमध्ये कंपनीच्या BNPL म्हणजेच बाऊ नाऊ पे लेटर व्यवसायात 55 टक्के वाढ झाली आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते BNPL हे पेटीएम कंपनीसाठी उच्च व्हॉल्यूम आणि कमी मार्जिन देणारे क्षेत्र आहे. वैयक्तिक कर्ज आणि व्यापारी कर्ज पेटीएम कंपनीला कमी व्हॉल्यूम आणि उच्च मार्जिन देते. म्हणून तज्ञांनी पेटीएम कंपनीच्या शेअरवर 850 रुपये लक्ष किंमत जाहीर करून स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

पेटीएम कंपनीने 5 जून 2023 रोजी सेबी फाइलिंगमध्ये कळवले आहे की, मार्च तिमाहीच्या पहिल्या दोन महिन्यांत कंपनीचे सरासरी मासिक वापरकर्ते वार्षिक 24 टक्क्यांच्या वाढीसह 92 दशलक्षवर पोहचले आहेत. त्याच वेळी कंपनीचा एकत्रित निव्वळ तोटा मार्च तिमाहीत 761.4 कोटी रुपयांवरून कमी होऊन 168.4 कोटी रुपये नोंदवला गेला आहे कंपनीचा परिचालन महसूल वार्षिक 51.5 टक्क्यांच्या वाढीसह 2,334.5 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Paytm Share Price today on 09 June 2023.

हॅशटॅग्स

#Paytm Share Price(79)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x