
Tata Motors Share Price | चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीचा कालावधी 30 जून 2023 रोजी संपला. आणि टाटा मोटर्स कंपनीने आपले तिमाही निकाल जाहीर केले. या जून 2023 तिमाहीत टाटा मोटर्स कंपनीने 3,300.65 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षीच्या याच तिमाही काळात टाटा मोटर्स कंपनीला 4,950.97 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता.
टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2 टक्के वाढीसह 641.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 26 जुलै 2023 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 0.070 टक्के घसरणीसह 639.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
शेअरची कामगिरी :
मागील पाच दिवसांत टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 3.23 टक्के वाढले आहेत. तर मागील एका महिन्यात टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना 11.50 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यात हा कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 43.40 टक्के नफा कमावून दिला आहे. तर YTD आधारे या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 61.85 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरची किंमत 43.90 टक्के वाढली आहे.
तिमाही निकाल डिटेल :
टाटा मोटर्स कंपनीने दिलेल्या माहितीनुसार समीक्षाधीन तिमाहीत कंपनीने एकूण 1,01,528.49 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील वर्षीच्या याच तिमाही कालावधीत कंपनीने 71,227.76 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. जून तिमाहीत टाटा मोटर्स कंपनीने 98,266.93 कोटी रुपये खर्च केले आहे. तर मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीचा एकूण खर्च 77,783.69 कोटी रुपये होता. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 138.30 टक्के परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.