 
						Tata Play IPO | टाटा समूह आपल्या टाटा प्ले या कंपनीतील 20 टक्के भाग भांडवल पुन्हा खरेदी करण्यासाठी सिंगापूरच्या टेमासेक होल्डिंग्स पीटीई कंपनीशी बोलणी करत आहे. या करारामुळे टाटा प्ले कंपनीचे बाजार मूल्य 1 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक वाढू शकते, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.
या डीलची सकारात्मक बातमी अशा वेळी आली आहे, जेव्हा टाटा प्ले कंपनी आपला IPO लॉन्च करण्याची तयारी करत आहे. टाटा प्ले IPO साठी सेबीने कंपनीला आधीच मंजुरी दिली आहे. मात्र तरीही कंपनीने IPO साठी थोडी दिरंगाई केली आहे.
तब्बल 18 वर्षांनी येणार IPO
टाटा समूहाचा भाग असलेल्या Tata Technologies कंपनीचा IPO देखील लवकरच लॉन्च होणार आहे. तथापि, आतापर्यंत या IPO ची लॉन्चिंग तारीख आणि इश्यू किंमत कंपनीने अद्याप जाहीर केली नाहीये. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO हा टाटा ग्रुपचा आयपीओ तब्बल 18 वर्षांनंतर येणार आहे. टाटा समूहाचा भाग असलेल्या TCS कंपनीचा IPO 2004 साली शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता.
टाटा प्ले IPO डील तपशील
टाटा समूह आणि सिंगापूरच्या टेमासेक शेअर खरेदी करण्याच्या करारावर चर्चा करत आहे. टाटा प्ले ही कंपनी टाटा ग्रुप आणि वॉल्ट डिस्ने कंपनीच्या 21st Century Fox Inc यांनी स्थापन केलेला संयुक्त उपक्रम आहे. ही कंपनी सेट-टॉप बॉक्सेसद्वारे टेलिव्हिजन आणि अॅपद्वारे OTT व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवा प्रदान करते. या कंपनीचे सध्या भारतभर 23 दशलक्ष पेक्षा जास्त कनेक्शन चालू आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		