 
						Tata Power Share Price | वर्षाच्या शेवटी बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही प्रमुख निर्देशांक घसरणीसह बंद झाले होते. मात्र, दोन्ही प्रमुख निर्देशांक अजूनही त्यांच्या सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या खाली आहेत. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बीएसई सेन्सेक्सने 85,978.25 रुपयांचा उच्चांक गाठला होता, तर एनएसई निफ्टीने याच कालावधीत 26,277.35 रुपयांचा उच्चांक गाठला होता. आता टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअरसाठी तज्ज्ञांकडून ‘BUY’ कॉल देण्यात आला आहे.
टाटा पॉवर शेअरची सध्याची स्थिती
सोमवार, 30 डिसेंबर 2024 रोजी टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअर 1.58 टक्क्यांनी घसरून 392.70 रुपयांवर पोहोचला होता. टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 494.85 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 319.60 रुपये होता. टाटा पॉवर लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 1,24,507 कोटी रुपये आहे.
टाटा पॉवर शेअर टार्गेट प्राईस
शेअर बाजार विश्लेषकांनी ईटी नाऊ स्वदेश वृत्तवाहिनीवर संवाद साधताना सांगितले की, ‘टाटा पॉवर स्टॉकमध्ये 240 रुपये ते 400 रुपयांच्या रेंजमध्ये सकारात्मक तेजी पाहायला मिळाली होती. मात्र गेल्या १ महिन्यात हा शेअर 5.71 टक्क्यांनी घसरला आहे. विश्लेषकांच्या मते, टाटा पॉवर स्टॉक ३८० रुपयांच्या वरच्या पातळीवर टिकून राहिल्यास गुंतवणूकदारांनी शेअर होल्ड करावा. पुढच्या बाऊन्सनंतर टाटा पॉवर शेअर ४८० रुपयांपर्यंत पोहोचू शकतो आणि त्यानंतर शेअर ५६० रुपये पर्यंत वाढू शकतो.
टाटा पॉवर शेअरने किती परतावा दिला
मागील ५ दिवसात टाटा पॉवर शेअर 2.34% घसरला आहे. मागील १ महिन्यात टाटा पॉवर शेअर 5.71% घसरला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 9.81% घसरला आहे. मागील १ वर्षात टाटा पॉवर शेअरने 18.89% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात टाटा पॉवर शेअरने 580% परतावा दिला आहे. तसेच लॉन्ग टर्ममध्ये या शेअरने 3,750% परतावा दिला आहे. YTD आधारावर टाटा पॉवर शेअरने 18.89% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		