
Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स बुधवारी 1.8 टक्के वाढीसह 445 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीने जून तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर तज्ञांनी संमिश्र प्रतिक्रिया दिली आहे. जून तिमाहीत टाटा पॉवर कंपनीचा एकात्मिक निव्वळ नफा 31 टक्क्यांच्या वाढीसह 1,189 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. ( टाटा पॉवर कंपनी अंश )
कंपनीच्या निव्वळ नफ्यात मजबूत वाढ झालेली ही सलग 19 वी तिमाही आहे. टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांकी किमतीवरून 95 टक्के मजबूत झाले आहेत. शुक्रवार दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी टाटा पॉवर स्टॉक 0.060 टक्के वाढीसह 418.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
16 ऑगस्ट 2023 रोजी टाटा पॉवर स्टॉक 228.10 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किमतीवर ट्रेड करत होता. टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 470.85 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,36,936.28 कोटी रुपये आहे. LIC कंपनीने देखील टाटा पॉवर कंपनीचे 18,45,33,501 शेअर्स म्हणजेच 5.78 टक्के भागभांडवल धारण केले आहे.
चॉईस ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, टाटा पॉवर स्टॉकमध्ये 435 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट पाहायला मिळत आहे. तज्ञांनी टाटा पॉवर स्टॉक खरेदी करताना 420 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स 535-550 रुपये किमतीवर जाऊ शकतात.
CLSA फर्मने टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सवर अंडरपरफॉर्म रेटिंग देऊन 297 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. म्हणजेच हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 50 टक्के खाली येऊ शकतो. नुवामा इन्स्टिट्यूशनने टाटा पॉवर स्टॉकवर 346 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. जून तिमाहीत टाटा पॉवर कंपनीचे उत्पन्न वार्षिक आधारावर 12 टक्क्यांनी वाढून 16,810 कोटी रुपये नोंदवले गेले होते.
2023-24 च्या एप्रिल-जून तिमाहीत टाटा पॉवर कंपनीचे उत्पन्न 15003 कोटी रुपये नोंदवले गेले होते. चालू आर्थिक वर्षात टाटा पॉवर कंपनीने 20,000 कोटी रुपये भांडवली गुंतवणुक करण्याची योजना आखली आहे. आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या तिमाहीत टाटा पॉवर कंपनीने 4,000 कोटी रुपये भांडवली खर्च करण्याची घोषणा केली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.