
Tata Power Share Price Today | टाटा समूहाचा भाग असलेल्या ‘टाटा पॉवर’ कंपनीने नुकताच मार्च 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. मार्च तिमाहीत कंपनीच्या नफ्यात 48 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. या कालावधीत कंपनीचा निव्वळ नफा 939 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.
प्रामुख्याने महसुलात जबरदस्त वाढ झाल्यामुळे कंपनीच्या नफ्यात ही वाढ पाहायला मिळाली आहे..उत्कृष्ट तिमाही निकालांमुळे ब्रोकरेज फर्मने टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज मंगळवार दिनांक 9 मे 2023 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 0.42 टक्के वाढीसह 203.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
गुंतवणूकीचा सल्ला :
ब्रोकरेज फर्म शेअरखानच्या तज्ज्ञांच्या मते टाटा पॉवर कंपनीच्या शेअरची किंमत 245 रुपयेपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. सध्या हा स्टॉक 203 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ब्रोकरेज फर्मने शेअरवर बाय रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
कंपनी लाभांश देणार :
टाटा पॉवर कंपनीने आपल्या विद्यमान गुंतवणूकदारांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. टाटा पॉवर कंपनीच्या संचालक मंडळाने 31 मार्च 2023 रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षात शेअर गधारकांना प्रति इक्विटी शेअर 2 रुपये म्हणजेच 1 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरवर 200 टक्के टक्के लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे.
तिमाही कामगिरी :
मार्च 2023 तिमाहीत टाटा पॉवर कंपनीने 6 टक्क्यांच्या वाढीसह 12,755 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील वर्षी या कंपनीने 12,085 कोटी महसूल संकलित केला होता. वीज वितरण कंपन्यांमधील अधिक विक्री आणि अक्षय ऊर्जा क्षमतेची वाढ यामुळे कंपनीच्या महसुलात वाढ पाहायला मिळत आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.