
Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर लिमिटेडचे शेअर्स रिकव्हरी मोडमधे वाढत आहेत. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा पॉवर कंपनीच्या शेअरने आपली 7 महिन्यांची सर्वोच्च पातळी किंमत स्पर्श केली आहे. या व्यवहारादरम्यान शेअर 227 रुपयेवर पोहचला होता. 8 डिसेंबर 2023 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर 225.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
मात्र आता टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्स तब्बल 7 महिन्यांनंतर पुन्हा एकदा ही किंमत स्पर्श केली आहे. 28 मार्च 2023 पासून आतापर्यंत टाटा पॉवर कंपनीच्या शेअरची किंमत 23 टक्क्यांनी वाढली आहे. 28 मार्च 2023 रोजी स्टॉक हा स्टॉक 183.95 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. मागील 3.5 महिन्यांत टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 23.36 टक्के मजबूत झाले आहेत. आज गुरूवार दिनांक 13 जुलै 2023 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 1.81 टक्के घसरणीसह 222.20 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
अनेक रेटिंग एजन्सींनी केलेल्या आउटलुक अपग्रेडमुळे या वर्षी मार्च 2023 अखेरच्या रॅलीमध्ये टाटा पॉवर स्टॉक मजबूत झाला आहे. दरम्यान एप्रिल 2022 च्या शेवटी S & P ग्लोबल रेटिंग्स फर्मने टाटा पॉवर स्टॉकवरील स्थिर दृष्टीकोन व्यक्त करून स्टॉक रेटिंग ‘BB+’ जाहीर केली. 21 जून 2023 रोजी इंडिया रेटिंग्ज फर्मने टाटा पॉवर कंपनीच्या अतिरिक्त नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचरचे रेटिंग अपग्रेड केले होते. अलीकडेच CRISIL रेटिंग फर्मने देखील टाटा पॉवर कंपनीच्या नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचरवर AA/स्टेबल अशी रेटिंग दिली होती.
5 मे 2023 रोजीटाटा पॉवर कंपनीने आर्थिक वर्ष 2022-23 चे मार्च तिमाहीचे निकाल जाहीर करून निव्वळ मद्यात 48 टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती दिली. या कालावधीत कंपनीच्या निव्वळ नफा 939 कोटी रुपयेवर पोहचला आहे. मागील वर्षी याच तिमाही कालावधीत कंपनीचा निव्वळ नफा 632 कोटी रुपये नोंदवला गेला होता. याशिवाय टाटा पॉवर कंपनीने 6 टक्के वाढीसह 12,755 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. Tips2Trades फर्मचे तज्ञ स्टॉक घसरण्याची शक्यता व्यक्त करत आहेत. तज्ञांच्या मते हा स्टॉक पुन्हा 204 रुपयांपर्यंत घसरू शकतो.
टाटा पॉवर कंपनीची ऑर्डर बुक मजबूत आहे. मागील एक वर्षापासून टाटा पॉवर स्टॉक मंदीच्या गर्तेतून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे. पुढील एका वर्षात टाटा पॉवर स्टॉक 370 रुपये किमतीपर्यंत देखील जाऊन शकतो. मात्र तज्ञांनी 197 रुपये किमतीवर स्टॉप लॉस ठेवून गुंतवणूक करावी. उन्हाळी हंगामात वाढलेल्या विजेच्या मागणीमुळे टाटा पॉवर कंपनीच्या शेअरची किंमत वाढत होती. भारतातील विजेची मागणी वार्षिक 8 टक्के दराने वाढत असून याचा फायदा टाटा पॉवर कंपनीच्या शेअरला आणि गुंतवणूकदारांना होत आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.