1 May 2025 4:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये नेमकं काय चाललंय? तज्ज्ञांनी मत जाणून घ्या, फायदा होणार की नुकसान जाणून घ्या

Tata Power Share Price

Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारी ट्टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 242.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर सोमवारी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 4.07 टक्के वाढीसह 239.35 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. सध्या टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स मार्च 2023 मध्ये स्पर्श केलेल्या नीचांक किंमत पातळीच्या तुलनेत 31 टक्के मजबूत झाले आहेत. 28 मार्च 2023 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 182.45 रुपये हा नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.

टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स एक महिना, तीन महिने, सहा महिने, एक वर्ष या कालावधीत अनुक्रमे 10 टक्के, 16.30 टक्के, 15.13 टक्के, 2.86 टक्के मजबूत झाले आहेत. आज गुरूवार दिनांक 24 ऑगस्ट 2023 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 1.85 टक्के वाढीसह 250.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

टाटा पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, नुकताच या कंपनीने एका नवीन करारावर स्वाक्षरी केली आहे. Tata Power Renewable Energy Limited या टाटा पॉवर कंपनीच्या उपकंपनीने उत्तराखंड राज्यातील टाटा मोटर्स कंपनीच्या पंतनगर प्लांटसोबत वीज खरेदी करार संपन्न केला आहे. हा सोलर प्लांट उत्तराखंड राज्यातील सर्वात मोठा सोलर पॉवर प्लांट आहे. हा प्रकल्प पुढील सहा महिन्यांत सुरू होण्याची शक्यता आहे.

टाटा पॉवर कंपनीने आपल्या जून 2023 तिमाहीच्या निकालात माहिती दिली की, जून 2023 तिमाहीत टाटा पॉवर कंपनीने 22 टक्के वाढीसह 972.5 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत टाटा पॉवर कंपनीने 784.6 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

मागील आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत टाटा पॉवर कंपनीने 14,495.5 कोटी रुपये महसूल संकलित केला होता, जो आता 5 टक्के वाढला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून या तिमाहीत कंपनीने 15,213.3 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. जून 2022 तिमाहीत कंपनीचा EBITDA 1683.4 कोटी रुपये होता, जो जून 2023 मध्ये 75 टक्के वाढीसह 2,9436 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.

प्रभुदास लिलाधर फर्मच्या तज्ञांच्या मते टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत वाढ होऊ शकते. म्हणून तज्ञांनी या स्टॉकवर 252 ते 254 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. प्रोग्रेसिव्ह शेअर्सच्या तज्ञांनी टाटा पॉवर स्टॉकवर 281 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. तर Tips2Trades फर्मच्या तज्ञांच्या मते टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 255 रुपये किंमत स्पर्श करतील. एसएमसी ग्लोबल फर्मच्या तज्ञांनी टाटा पॉवर कंपनीच्या स्टॉकवर 255-259 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. टाटा पॉवर स्टॉकमध्ये गुंतवणुकीच्या सल्यासह तज्ञांनी 215 रुपयेवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला देखील आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Power Share Price today on 24 August 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Tata Power Share Price(162)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या