 
						Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.5 लाख कोटी रुपये आहे. शुक्रवारी या कंपनीचे एकूण 58.04 कोटी रुपये मूल्याचे 12.53 लाख शेअर्स ट्रेड झाले होते. 16 ऑगस्ट 2023 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 228.10 रुपये या 52 आठवड्यांच्या नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी टाटा पॉवर स्टॉक 0.95 टक्के घसरणीसह 460 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( टाटा पॉवर कंपनी अंश )
2024 मध्ये टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये 39.43 टक्के वाढ पाहायला मिळाली होती. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 95.52 टक्के परतावा कमावून दिला आहे. टाटा पॉवर स्टॉकचा RSI 65.3 अंकावर आहे. म्हणजेच हा स्टॉक ओव्हरबॉट झोनच्या जवळ पोहचला आहे. टाटा पॉवर स्टॉक आपल्या 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या SMA किमतीच्या तुलनेत जास्त किमतीवर ट्रेड करत आहे.
प्रभुदास लिल्लाधर फर्मच्या तज्ञांच्या मते, टाटा पॉवर स्टॉकमध्ये 400 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. नुकताच या स्टॉकने 432 रुपये ही आपली 50 दिवसांची EMA पातळी ओलांडली आहे. तज्ञांच्या मते, पुढील काळात हा स्टॉक 495 रुपये ते 522 रुपये किमतीवर जाऊ शकतो. StoxBox फर्मच्या तज्ञांच्या मते, टाटा पॉवर स्टॉक पुढील काळात 520 रुपये किमतीवर जाऊ शकतो. ऑक्टोबर 2023 मध्ये या कंपनीचे शेअर्स आपल्या नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीच्या तुलनेत हा स्टॉक 100 टक्केपेक्षा जास्त वाढला आहे.
शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 520 रुपये किमतीवर जाऊ शकतो. गुंतवणूकदारांनी या स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना 441 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावणे आवश्यक आहे. आनंद राठी फर्मच्या तज्ञांच्या मते, या स्टॉकने 450 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. तसेच या स्टॉकला 471 रुपये किमतीवर जोरदार प्रतिकार मिळत आहे. जर या स्टॉकने 471 रुपये किमतीवर ब्रेकआऊट दिला तर शेअर 485 रुपये किमतीवर जाऊ शकतो. या स्टॉकची अपेक्षित ट्रेडिंग रेंज 440-480 रुपये असेल.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		