 
						Tata Power Vs Adani Power Share | मागील काही काळापासून अदानी पॉवर आणि टाटा पॉवर या वीज निर्मिती क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या दोन दिग्गज कंपन्याच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. या दोन्ही कंपनीच्या शेअरनी मागील तीन वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. या कालावधीत, अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स 902 टक्के मजबूत झाले आहेत. तर टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 368 टक्के मजबूत झाले आहेत.
मागील दोन वर्षांच्या कालावधीत अदानी पॉवर कंपनीच्या शेअर्सनी मागील दोन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 262 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर टाटा पॉवर कंपनीने याच कालावधीत आपल्या गुंतवणुकदारांना 51.20 टक्के परतावा कमावून दिला आहे.
शुक्रवार दिनांक 7 ऑक्टोबर 2023 रोजी अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स 0.64 टक्के घसरणीसह 363.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 0.39 टक्के वाढीसह 258.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावाखाली 365 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अदानी पॉवर कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 410 रुपये होती. त्याचवेळी टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स किंचित वाढीसह 260 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 8 सप्टेंबर रोजी टाटा पॉवर कंपनीच्या शेअरने 276.50 रुपये ही उच्चांक किंमत स्पर्श केली होती.
शेअर बाजारातील तज्ञांच्या मते टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 300 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. आणि तज्ञांच्या मते कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या समस्यांव्यतिरिक्त, अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स मजबूत नफा वाढ आणि परतावा गुणोत्तराच्या बाबतीत टाटा पॉवर कंपनीच्या शेअरपेक्षा मूलभूतपणे मजबूत आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		