
Tata Power Vs GMR Power Share | GMR पॉवर अँड अर्बन इन्फ्रा लिमिटेड या पॉवर सेक्टरमध्ये व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअरने अवघ्या एका महिन्यात आपल्या शेअर धारकांना मजबूत कमाई करून दिली आहे. 18 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 22.78 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर बुधवार दिनाल 20 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 48.60 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
आज मात्र या स्टॉकमध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. अवघ्या एका महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 113 टक्के वाढली आहे. आज गुरूवार दिनांक 21 सप्टेंबर 2023 रोजी GMR पॉवर अँड अर्बन इन्फ्रा लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5.01 टक्के घसरणीसह 41.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
GMR पॉवर अँड अर्बन इन्फ्रा लिमिटेड या कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, मागील काही महिन्यात या कंपनीला हजारो कोटींच्या नवीन ऑर्डर्स मिळाल्या आहेत. 12 सप्टेंबर 2023 रोजी उत्तर प्रदेश राज्य सरकारने GMR पॉवर कंपनीला 2,470 कोटी रुपये मूल्याचे स्मार्ट मीटरिंग प्रकल्पाचे काम दिले आहे. या प्रोजेक्टसाठी LOA जारी केल्यानंतर GMR पॉवर कंपनीच्या स्टॉकमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळाली आहे.
4 सप्टेंबर 2023 रोजी GMR पॉवर कंपनीच्या युनिटला उत्तर प्रदेश राज्यामध्ये 5,000 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली होती. यानंतर या कंपनीचे शेअर्स 20 टक्के अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते. GMR पॉवर अँड अर्बन इन्फ्रा लिमिटेड कंपनीमध्ये प्रवर्तकांनी एकूण 59.83 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.
जून 2023 मध्ये संपलेल्या तिमाहीच्या शेअर होल्डर डेटानुसार कंपनीच्या 21 प्रवर्तकांनी कंपनीचे 59.83 टक्के भाग भांडवल होल्ड केले आहे. त्याच वेळी 3.24 लाख सार्वजनिक शेअर धारकांनी कंपनीचे 40.17 टक्के म्हणजेच 24.24 कोटी शेअर्स होल्ड केले आहे. 2023-24 या चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत, GMR पॉवर कंपनीला 205 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला आहे.
मागील वर्षी जून 2022 मध्ये संपलेल्या तिमाहीमध्ये या कंपनीला 212.7 कोटी रुपये निव्वळ नफा झाला होता. जून 2022 ला संपलेल्या तिमाहीमध्ये GMR पॉवर कंपनीने 1163.4 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत कंपनीने 1190.4 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.