Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर ओव्हरबॉट झोनजवळ, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा – Gift Nifty Live

Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित तेजी पाहायला मिळत आहे. मागील 3 महिन्यात टाटा स्टील कंपनीच्या (NSE : TataSteel) शेअर्समध्ये 4 टक्के घसरण पहायला मिळाली आहे. मागील एका वर्षात टाटा स्टील स्टॉक 1.5 च्या बीटासह अस्थिर झाला आहे. या स्टॉकचा RSI 69.3 अंकावर आहे. म्हणजेच हा स्टॉक ओव्हरबॉट झोनजवळ पोहचला आहे. 2 नोव्हेंबर 2023 रोजी टाटा स्टील स्टॉक 114.25 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किमतीवरून 47 टक्के वाढला आहे. शुक्रवार दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 0.26 टक्के वाढीसह 167.42 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (टाटा स्टील कंपनी अंश)

5 आणि 10 वर्षाचा परतावा :
मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 31.17 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2024 या वर्षात टाटा स्टील स्टॉक 20 टक्के वाढला आहे. मागील पाच वर्षांत हा स्टॉक 394 टक्के आणि दहा वर्षांत 298 टक्के मजबूत झाला आहे. टाटा स्टील कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2.09 लाख कोटी रुपये आहे. टाटा स्टील स्टॉक आपल्या 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 30 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, 150 दिवस आणि 200 दिवसांच्या मुव्हिंग ॲव्हरेजपेक्षा जास्त किमतीवर ट्रेड करत आहे.

शेअरची टार्गेट प्राईज आणि रेटिंग :
टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सने 18 जून 2024 रोजी 184.60 रुपये ही उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. मॉर्गन स्टॅन्लीने टाटा स्टील स्टॉकला ‘इक्वल-वेट’ रेटिंग देऊन टार्गेट प्राईज 30 टक्के वाढवली आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉप पुढील काळात 175 रुपये किमतीवर जाऊ शकतो. जेएम फायनान्शियल फर्मच्या तज्ञांनी टाटा पॉवर स्टॉक 180 रुपये या टार्गेट प्राईससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांनी या स्टॉकमध्ये 12 महिन्यांसाठी गुंतवणूक करण्याची शिफारस केली आहे. जेफरीजने टाटा स्टील स्टॉकवर 200 रुपये टार्गेट प्राईज जाहीर केली आहे.

HDFC सिक्युरिटीज फर्म – टार्गेट प्राईस
HDFC सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांच्या मते, स्टॉक पुढील काळात 175-188 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 150 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांच्या मते टाटा स्टील स्टॉकने 142 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. AVP मास्टर कॅपिटल सर्व्हिसेस फर्मच्या तज्ञांनी या स्टॉकवर 176 रुपये टारगेट प्राईज आणि 150 रुपये स्टॉपलॉस जाहीर केला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Tata Steel Share Price 04 October 2024 Marathi News.