
Tata Steel Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा स्टील कंपनीचे शेअर्स मंगळवारी 183.80 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. ब्रोकरेज फर्म अॅक्सिस सिक्युरिटीजच्या मते, टाटा स्टील स्टॉक 197 रुपये किमतीवर जाऊ शकतो. ( टाटा स्टील कंपनी अंश )
आज देखील हा स्टॉक हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहे. टाटा स्टील कंपनीच्या ब्रिटनमधील पोर्ट टॅलबोट येथील प्लांटमध्ये 1.25 अब्ज पौंडच्या प्रस्तावित गुंतवणूकीमध्ये ब्रिटन सरकार आणि विरोधी पक्षांमधील धोरणात्मक मतभेदांमुळे अडचण येण्याची शक्यता आहे.
पोर्ट टॅलबोट स्टील प्लांटमधून होणारा कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी टाटा स्टील आणि ब्रिटिश सरकारने सप्टेंबर 2023 मध्ये 1.25 अब्ज पौंड संयुक्त गुंतवणूक करण्याची योजना जाहीर केली होती. या पैकी 500 दशलक्ष पौंड रक्कम ब्रिटिश सरकारने देण्याचे मान्य केले होते. आज बुधवार दिनांक 12 जून 2024 रोजी टाटा स्टील स्टॉक 0.56 टक्के वाढीसह 182.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
टाटा स्टील कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, टाटा स्टील कंपनीच्या ब्रिटीश स्टील शाखेत 1.25 अब्ज पौंड गुतवणूक करण्याचे कंझव्हेटिव्ह पार्टी आणि लेबर पार्टीने मंजूर केले होते. त्यांच्यात निर्माण झालेल्या धोरणात्मक मतभेदांमुळे ही योजना अडचणीत येण्याची शक्यता आहे.
टाटा स्टील कंपनी पुढील काही महिन्यांत पोर्ट टॅलबोट प्लांटमधील कामकाज बंद करण्याच्या तयारीत आहे. टाटा स्टील कंपनी पोर्ट टॅलबोट येथे यूके मधील सर्वात मोठा स्टील प्लांट चालवते. या प्लांटची क्षमता वार्षिक 3 दशलक्ष टन आहे. या प्लांटमधून 8,000 लोकांना रोजगार मिळत आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.