
Tata Steel Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सनी मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये 3 टक्के घसरण नोंदवली आहे. टाटा स्टील कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 175.68 रुपये किमतीवर ओपन झाले होते. आज हा स्टॉक किंचित नफा वसुलीला सामोरे जात आहे. या कंपनीचे शेअर्स 184.60 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवरून खाली आले आहेत. आज गुरूवार दिनांक 27 जून 2024 रोजी टाटा स्टील स्टॉक 0.25 टक्के घसरणीसह 172.12 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( टाटा स्टील कंपनी अंश )
नुकताच टाटा स्टील कंपनीने IFQM मधील 14.28 टक्के भागभांडवल खरेदी केल्याची अपडेट दिली होती. मागील आठवड्यात टाटा स्टील कंपनीचे शेअर्स एक्स डिव्हीडंट म्हणून ट्रेड करत होते. या कंपनीने आपल्या शेअर्सच्या दर्शनी किमतीवर 360 टक्के लाभांश देण्याची घोषणा केली होती. टाटा स्टील स्टॉक 24 जून रोजी बीएसईवर 1.24 टक्के घसरणीसह 175.70 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2,19,334.09 कोटी आहे.
मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा स्टील स्टॉक 2.95 टक्के घसरला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 60 टक्के परतावा कमावून दिला आहे. टाटा स्टील कंपनीने 25 जून रोजी इंडियन फाऊंडेशन फॉर क्वालिटी मॅनेजमेंटमधील 10 रुपये दर्शनी मूल्याचे 1,25,00,000 इक्विटी शेअर्स खरेदी केल्याची घोषणा केली होती. यासाठी कंपनीने 12.5 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे.
विविध क्षेत्रातील भारतीय संस्थांना व्यवस्थापनाच्या सर्व पैलूंमध्ये दर्जेदार मूल्ये, तत्त्वे आणि पद्धती अंगीकारण्यासाठी आणि एकत्रित करण्यासाठी IFQM ची विभाग 8 कंपनी म्हणून स्थापना करण्यात आली आहे. IFQM ही कंपनी कायदा, 2013 च्या कलम 8 अंतर्गत नोंदणीकृत झालेली खाजगी मर्यादित कंपनी आहे.
टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 21 जून 2024 रोजी एक्स-डिव्हिडंड म्हणून ट्रेड करत होते. या कंपनीने आपल्या पात्र गुंतवणुकदारांना 3.60 रुपये प्रति शेअर अंतिम लाभांश वाटप केला आहे. कंपनी 19 जुलै 2024 पर्यंत गुंतवणूकदारांच्या खात्यात लाभांश जमा करेल. टाटा स्टील स्टॉक 2022 मध्ये 10:1 या प्रमाणात विभाजित करण्यात आला होता. त्यानंतर कंपनीचे शेअर्स स्वस्त किमतीवर व्यवहार करत होते. सध्या शेअर बाजारातील 28 तज्ञांनी टाटा स्टील स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. 9 तज्ञांनी टाटा स्टील स्टॉकवर ‘स्ट्राँग बाय’ रेटिंग दिली आहे. तर 4 तज्ञांनी घसरणीच्या काळात स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.