
Tata Steel Share Price | सध्या शेअर बाजारात जबरदस्त चढ उतार पाहायला मिळत आहे. याचा किंचित परिणाम टाटा उद्योग समूहाच्या ‘टाटा स्टील’ कंपनीच्या शेअरवर देखील पहायला मिळत आहे. सोमवार दिनांक 13 मार्च 2023 रोजी ‘टाटा स्टील’ कंपनीचे शेअर्स 0.23 टक्के घसरणीसह 107.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘टाटा स्टील’ कंपनीचे शेअर्स लाल निशाणीवर ट्रेड करत होते. ‘टाटा स्टील’ कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,30,691.92 कोटी आहे. 6 एप्रिल 2022 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 138.63 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमतीवर पोहचले होते. तर 23 जून 2022 रोजी टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सनी 82.71 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नीचांक किंमत स्पर्श केली होती.
‘टाटा स्टील’ स्टॉकबाबत तज्ञांचे मत :
IIFL सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी टाटा स्टील स्टॉकबाबत सकारात्मक मात्र व्यक्त केले आहे. ‘टाटा स्टील’ कंपनीच्या शेअरने 100 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट लेव्हल तयार केला आहे. पुढील काळात हा स्टॉक 115-120 रुपयांपर्यंत जाऊ शकतो, असे मत स्टॉक मार्केट तज्ञांनी व्यक्त केले आहे. आनंद राठी फर्मच्या तज्ञांनी 100 रुपयेच्या स्टॉप लॉससह ‘टाटा स्टील’ कंपनीच्या स्टॉकवर 133 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. यासह त्यांनी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
ब्रोकरेज फर्मने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, ‘टाटा स्टील’ कंपनी वार्षिक 34 दशलक्ष टन कच्चे स्टील उत्पादन क्षमता असलेली आणि जगभरातील विविध देशासोबत व्यापार करणाऱ्या सर्वात मोठ्या स्टील कंपन्यापैकी एक आहे. भारतात निर्यात शुल्क लागू झाल्यामुळे काही काळ स्टीलच्या किमतीत वाढ झाली होती, याचा फटका ‘टाटा स्टील’ कंपनीला देखील बसला होता. शेअर बाजार तज्ज्ञांच्या मते टाटा स्टील कंपनीचे शेअर्स पुढील काळात 122 ते 128 रुपये किंमतीवर पोहोचतील. तथापि जीसीएल फर्मचे तज्ञ टाटा स्टील कंपनीचे शेअर्स घसरतील असा अंदाज व्यक्त करत आहेत. जीसीएल फर्मच्या मते टाटा स्टील कंपनीचे शेअर्स पुढील काळात 95 रुपयेपर्यंत खाली येऊ शकतात.
टाटा स्टील कंपनीची आर्थिक कामगिरी :
डिसेंबर 2022 च्या तिमाही निकालाप्रमाणे ‘टाटा स्टील’ कंपनीला 2,502 कोटी रुपये नुकसान सहन करावा लागला होता. एक वर्षभरापूर्वी याच तिमाहीत टाटा स्टील कंपनीने तब्बल 9,598,16 कोटी रुपये प्रॉफिट कमाई केली होती. ‘टाटा स्टील’ कंपनीच्या स्पष्टीकरणानुसार डिसेंबर 2022 च्या तिमाहीत कंपनीच्या वाढत्या खर्चामुळे त्यांना तोटा सहन करावा लागला होता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.