
Tata Group Share | शेअर बाजारात जे स्टॉक झटकन वर जातात, ते तेवढ्याच वेगाने खाली येतात. मात्र जे स्टॉक हळूहळू पण स्थिरपणे वाढतात, ते स्टॉक दीर्घ काळात मजबूत परतावा मिळवून देतात. कमी-जास्त बाजार भांडवल असलेले हे स्टॉक आपल्या शेअर धारकांना मजबूत परतावा कमावून देतात. अशा वेळी टाटा उद्योग समूहाचा एक स्टॉक शेअर बाजारातील तज्ञाच्या फोकसमध्ये आला आहे, ज्याचे नाव आहे, टाटा स्टील. टाटा स्टील कंपनीचे शेअर मागील काही दिवसांपासून हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहेत. त्याच वेळी मागील 6 महिन्यांत टाटा स्टील कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम कमाई करून दिली आहे.
टाटा स्टील स्टॉकमधील रॅली :
12 डिसेंबर 2022 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स NSE निर्देशांकावर 1.5 रुपये म्हणजेच 1.36 टक्के वाढीसह 111.95 किमतीवर ट्रेड करत होते. टाटा स्टील स्टॉक अजूनही आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक पातळी किमतीच्या खाली ट्रेड करत आहे. परंतु टाटा स्टील कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किमतीच्या जवळ ट्रेड करत आहेत. टाटा स्टील कंपनीच्या शेअरने सहा महिन्यांपूर्वी आपली 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी स्पर्श केली होती, मात्र नंतर स्टॉकमध्ये जबरदस्त सुधारणा पाहायला मिळाली होती.
52 आठवड्यांची उच्चांक आणि नीचांक किंमत :
टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 82.70 रुपये होती. तर टाटा स्टील कंपनीच्या शेअरने 2022 यावर्षी जून महिन्यात 52 आठवड्यांची उच्चांक किंमत स्पर्श केली होती. तेव्हापासून या शेअरमध्ये तेजी कायम आहे. सध्या टाटा स्टील कंपनीच्या शेअरची किंमत आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमतीच्या 35 टक्के वर ट्रेड करत आहे. सध्या टाटा स्टील कंपनीचा शेअर 110-113 रुपये दरम्यान ट्रेड करत आहे.
टाटा स्टील ची ऊचांक किंमत :
शेअर बाजारातील मेटल सेगमेंटमध्ये पैसे लावणाऱ्या गुंतवणूकदारांना टाटा स्टील स्टॉकमध्ये खूप इंटरेस्ट आहे. मागील 6 महिन्यांत टाटा स्टील स्टॉक 83 रुपयांवरून 110 रुपये किमतीवर पोहचला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना या स्टॉकने बक्कळ कमाई करून दिली आहे. टाटा स्टील कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 138.67 रुपये आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.