 
						Tata Technologies IPO | टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO 22-24 नोव्हेंबर दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या IPO ला गुंतवणूकदारांनी अप्रतिम प्रतिसाद दिला आहे. अवघ्या 3 दिवसात टाटा टेक्नॉलॉजी IPO 69.43 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. अँकर गुंतवणूकदारांची गुंतवणूक वगळून टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO मध्ये 1.56 लाख कोटी रुपये मूल्याची बोली प्राप्त झाली आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO 2023 या वर्षातील सर्वात मोठा IPO मानला जात आहे.
टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO मध्ये, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 203.41 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. तर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 62.11 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. आणि किरकोळ गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 16.5 पट अधिक भरला आहे.
टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने प्रवर्तक कंपनी टाटा मोटर्सच्या गुंतवणूकदारांसाठी देखील काही वाटा राखीव ठेवला होता. यामध्ये 29.19 पट अधिक बोली प्राप्त झाली आहे. ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ञांच्या मते, टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO स्टॉक 403 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे. आणि कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 475-500 रुपये निश्चित केली आहे.
टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO हा पूर्णतः ऑफर फॉर सेल अंतर्गत लाँच करण्यात आला आहे. या IPO मध्ये, OFS अंतर्गत टाटा मोटर्स कंपनी 4 कोटी 62 लाख शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे. तर अल्फा TC होल्डिंग्स कंपनी 97.1 लाख शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे. टाटा कॅपिटल ग्रोथ फंड देखील 48 लाख शेअर्स विकण्यास उत्सुक आहे.
टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने पात्र संस्थात्मक गुंतवणुकदारांसाठी 50 टक्के वाटा राखीव ठेवला होता. तर रिटेल गुंतवणूकदार आणि गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी कंपनीने अनुक्रमे 35 टक्के आणि 15 टक्के वाटा राखीव ठेवला होता. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 30 नोव्हेंबर रोजी वाटप केले जातील. तर 5 डिसेंबर 2023 रोजी BSE आणि NSE इंडेक्सवर सूचीबद्ध केले जातील.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		