
Tata Technologies IPO | शेअर बाजारात गुंतवणूकदारांचा सर्वात जास्त विश्वास टाटा ग्रूपच्या कंपन्यावर आहे. कारण टाटा ग्रुप हा भारतातील सर्वात जुना आणि सर्वात फायदेशीर ग्रुप म्हणून ओळखला जातो. सध्या टाटा ग्रुप आपल्या एका कंपनीचा IPO लाँच करण्याची तयारी करत आहे. (Tata Technologies Share Price)
तब्बल 19 वर्षांनंतर टाटा ग्रुप कंपनीचा IPO
तब्बल 19 वर्षांनंतर टाटा ग्रुपचा भाग असलेल्या कंपनीचा IPO शेअर बाजारात दाखल होणार आहे. या कंपनीचे नाव आहे, टाटा टेक्नॉलॉजी. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO ला सेबीने हिरवा कंदील दाखवला आहे. टाटा टेक्नोलॉजीज कंपनीने मार्च 2023 मध्ये IPO साठी कागदपत्रे दाखल केले होते. (Tata Technologies IPO Date)
टाटा टेक्नोलॉजीज IPO तपशील
टाटा टेक्नोलॉजीज कंपनीचा IPO पूर्णतः इश्यू ऑफर फॉर सेल नातर्गत लाँच करण्यात येणार आहे. या IPO मध्ये कंपनीचे शेअर होल्डर्स 9.57 कोटी शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहेत. हे प्रमाण एकूण पेड-अप शेअर कॅपिटलच्या 23.60 टक्के आहे. टाटा टेक्नोलॉजीज ही कंपनी टाटा मोटर्सची उपकंपनी आहे.
टाटा टेक्नोलॉजीज कंपनीत भाग भांडवल
टाटा टेक्नोलॉजीज कंपनीत टाटा मोटर्सने 74.69 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. यासह अल्फा टीसी होल्डिंग्ज पीटीई कंपनीने टाटा टेक्नोलॉजीज कंपनीचे 7.26 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. तर टाटा कॅपिटल ग्रोथ फंडने देखील 3.63 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत.
81,133,706 शेअर्स खुल्या बाजारात विकणार
जेएम फायनान्शियल लिमिटेड, सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया आणि BofA सिक्युरिटीज इंडिया यांना टाटा टेक्नॉलॉजी IPO इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. टाटा टेक्नोलॉजीज IPO अंतर्गत टाटा मोटर्स कंपनी आपले 81,133,706 शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे. तर टाटा टेक्नोलॉजीज कंपनीचे इतर दोन गुंतवणुकदार आणि टाटा कॅपिटल ग्रोथ फंड आपले शेअर्स IPO मध्ये खुल्या बाजारात विकणार आहे. (Tata Technologies IPO Tata Motors)
गुंतवणुकदार टाटा टेक्नोलॉजीज IPO ची आतुरतेने वाट पाहत आहे
टाटा समूहाचे एकूण बाजार भांडवल 11.7 लाख कोटी रुपये आहे. शेअर बाजारातील गुंतवणुकदार टाटा टेक्नोलॉजीज IPO ची आतुरतेने वाट पाहत आहे. कारण तब्बल 19 वर्षांनंतर टाटा समूहाच्या IPO मध्ये गुंतवणूक करण्याची संधी लोकांना मिळणार आहे. टाटा समूहाचा भाग असलेल्या कंपनीचा शेवटचा IPO जुलै 2004 मध्ये आला होता. हा IPO टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीचा होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.